चित्रपट हिट होण्यासाठी कलाकार, दिग्दर्शक, निर्माते मंडळींकडून निरनिराळे प्रयत्न केले जातात. प्रमोशन आणि चित्रपट प्रदर्शनाच्या शकलांमध्ये लढवली जाणारी एक शक्कल म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात चित्रपट प्रदर्शित करणे. गेली ५-६ वर्षे हा प्रयोग होताना दिसत असून, तो यशस्वीही होताना पाहायला मिळते. जसे की, ‘झेंडा, नटरंग, शाळा, बालक पालक, टाइमपास, क्लासमेट्स’ हे सर्व चित्रपट जानेवारी महिन्यातच प्रदर्शित झाले होते आणि प्रचंड गाजलेही. आता या यादीत ‘गुरू’ या चित्रपटाची भर पडत आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी आणि ऊर्मिला कानिटकर प्रमुख भूमिकेत दिसतील. हा चित्रपट २०१६च्या जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे जानेवारी महिना संजय जाधवदिग्दर्शित ‘गुरू’साठी कितपत लकी ठरतो, हे बघू या...
‘गुरू’साठी जानेवारी ठरणार का लकी?
By admin | Updated: November 9, 2015 02:25 IST