Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजूबाबाने का धारण केला ‘मुस्सा’चा अवतार?

By admin | Updated: June 14, 2017 02:09 IST

अभिनेता संजय दत्त मुलगी त्रिशाला हिच्या खूपच क्लोज आहे. सध्या त्रिशाला न्यूयॉर्क येथे असून, संजूबाबा दररोज तिच्याशी फेसटाइमच्या माध्यमातून संपर्कात असतो.

अभिनेता संजय दत्त मुलगी त्रिशाला हिच्या खूपच क्लोज आहे. सध्या त्रिशाला न्यूयॉर्क येथे असून, संजूबाबा दररोज तिच्याशी फेसटाइमच्या माध्यमातून संपर्कात असतो. त्रिशालाने नुकताच वडील संजय दत्तसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये बाप-लेकीची जुगलबंदी बघावयास मिळत आहे. त्रिशाला व्हिडीओमध्ये म्हणतेय की, ‘ते प्रत्येक वेळी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, की माझा बॉयफ्रेण्ड आहे की नाही? जेव्हा माझ्याकडून नाही असे उत्तर येते तेव्हा ते ‘प्लान’ चित्रपटातील मुस्साचा अवतार धारण करतात, अन् मला म्हणतात की, ‘मला माहीत आहे की, तू माझ्याशी खोटं बोलत आहे.’ त्रिशाला संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा हिची मुलगी आहे. ऋचाच्या मृत्यूनंतर त्रिशाला तिच्या आजी-अजोबांसोबत न्यूयॉर्क येथे राहात आहे. त्रिशाला एकप्रकारे संजूबाबाचे बळ आहे. जेव्हा संजूबाबा जेलमध्ये होता, तेव्हा त्रिशाला त्याला नियमितपणे पत्र लिहीत होती. त्यावेळी संजूबाबाने तिला एक पत्र लिहिताना म्हटले होते की, ‘तू माझी ताकद आहेस.’ काही दिवसांपूर्वीच मान्यता आणि त्रिशालाचे काही फोटोज लीक झाले होते. फोटोंमध्ये दोघीही मस्ती करताना बघावयास मिळत होत्या. दोघी एकमेकींसोबत खूपच आनंदी दिसत होत्या.