Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय दत्तच्या गर्लफ्रेन्डच्या लिस्टमध्ये ही हिरोईन कधीच का नसते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 11:15 IST

रिचा शर्मा, माधुरी दीक्षित, टिना मुनीम, मान्यता, रिहा पिल्लई यांचीच जास्त चर्चा होते. पण त्या काळातील एक अभिनेत्रीही त्याच्या गर्लफ्रेन्डच्या यादीत होती. 

मुंबई : संज दत्त याच्या 'संजू' सिनेमातून त्याच्या लाइफबाबत अनेक खलासे होणार आहेत. आधीपासूनच त्याच्या अफेअरची चर्चा होत होती. पण यात एका अभिनेत्री नाव फारच दुर्लक्षित दिसतं. रिचा शर्मा, माधुरी दीक्षित, टिना मुनीम, मान्यता, रिहा पिल्लई यांचीच जास्त चर्चा होते. पण त्या काळातील एक अभिनेत्रीही त्याच्या गर्लफ्रेन्डच्या यादीत होती. 

संजय दत्त याचे कितीतरी अफेअर्स होते हे काही कुणापासून लपलेलं नाहीये. पण त्याच्या गर्लफ्रेन्डच्या यादीत एका अभिनेत्रीचं नाव कधीच दिसत नाही. ते नाव म्हणजे, अभिनेत्री किमी काटकर. आपल्या हॉट अदांनी एक काळ गाजवणारी किमी फार पूर्वीच सिने इंडस्ट्रीपासून दूर केली. किमीही अनेक वादांमध्ये सापडली होती. पण तिच्या आणि संजय दत्तच्या नात्यावर फार कुणी चर्चाच केली नाही. 

(Image Credit : www.pressreader.com)

बॉलिवूड हंगामाच्या एका रिपोर्टनुसार, अभिनेत्री रिचा शर्माला भेटण्याआधी संजय दत्त हा किमी काटकरच्या प्रेमात होता. दोघे बराचकाळ सोबत होते. इतकेच नाहीतर संजय दत्त किमीच्या कुलाबामधील फ्लॅटवर नेहमी तिच्या परीवाराला भेटण्यासाठी जात असे. किमीच्या आईसाठी तो जेवण तयार करत असे. पण अचानक या दोघांमध्ये तिसरी व्यक्ती आली. ती म्हणजे रिचा शर्मा. 

रिचा शर्माला अभिनेते देव आनंद यांनी बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला होता. एका सिनेमाच्या मुहूर्ताला संजय आणि रिचाची भेट झाली. दोघेही एकमेकांना भेटू लागले. अशात किमी काटकरला संजयने एकटे सोडले. रिचासाठी संजयने किमी काटकरला सोडले होते. 

'संजू' या सिनेमात संजयच्या जवळपास सगळ्याच अफेअरबाबत बघायला मिळणार आहे. पण त्यात किमी काटकरचा उल्लेख असेल का हे सिनेमा पाहिल्यावरच कळेल. 

टॅग्स :संजय दत्तसंजू चित्रपट 2018