अभिनेता हृतिक रोशननं करण जोहरच्या सिनेमात काम करण्यास नकार दिला आहे. करणच्या कलंक सिनेमाला हृतिकचा रेड सिग्नल, मात्र राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या सिनेमाला मात्र ग्रीन सिग्नल असे चित्र आहे. आपल्या नव्या सिनेमासाठी राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी हृतिककडे विचारणा केली. हृतिकनं या सिनेमाला लगेच होकार दिलाय. सध्या राकेश मेहरा मिर्झिया सिनेमात बिझी आहेत. या सिनेमानंतर ते हृतिकसोबतच्या सिनेमावर काम करण्यास सुरुवात करणार आहेत. त्यातच हृतिकसुद्धा मोहन्जेदडो आणि काबिल सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हे शूटिंग आटोपल्यानंतर हृतिक आणि राकेश ओमप्रकाश मेहरा नव्या सिनेमावर काम करण्यास सुरुवात करणार आहेत. मात्र या सगळ्या घडामोडीमुळं करण आणि हृतिकमधील बिघडलेल्या संबंधांवर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झालंय.
हृतिक कुणाला देणार ग्रीन सिग्नल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2016 01:37 IST