अभिनेते नाना पाटेकर हे नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. सध्या नाना पाटेकर प्रकाश राज यांच्या ‘तडका’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. या चित्रपटात अभिनेत्री इरावती हर्षे नसली तरी तिला अनेक वेळा या चित्रपटाच्या सेटवर पाहण्यात येतेय. ती सेटवर खास नाना पाटेकर यांना भेटायला येत असल्याचे सूत्रांकडून कळतेय, तसेच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे चित्रीकरण गोव्यात सुरू होते. या वेळीही इरावती नानाला भेटायला गोव्यात गेली असल्याचे कळतेय. या आधीही नानाचे मनीषा कोइराला, दीप्ती नवल यांसारख्या अभिनेत्रींसोबतचे प्रेमप्रकरण गाजले होते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}