Join us

दगडूची ‘पराजू’ कोण?

By admin | Updated: March 12, 2015 00:04 IST

हम गरीब हुए तो क्या हुआ...’ असं म्हणत यंगस्टर्सच्या मनात घर करणारी दगडू-प्राजक्ताची जोडी पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

‘हम गरीब हुए तो क्या हुआ...’ असं म्हणत यंगस्टर्सच्या मनात घर करणारी दगडू-प्राजक्ताची जोडी पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘टाइमपास-2’मध्ये दगडू-प्राजक्ताच्या भूमिकेत कोण असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. कारण नुकतेच दिग्दर्शक रवी जाधवने सोशल साइट्सवर ‘दगडू’सह सई ताम्हणकर, अमृता खानविलकर आणि सोनाली कुलकर्णी यांचे फोटो अपलोड केले आहेत. त्यामुळे आता सर्वांनाच याबाबत उत्सुकता असून १३ मार्च रोजी रवी जाधव हे सिक्रेट रिव्हील करणार आहे.