Join us

केजो पुन्हा एकदा सक्रिय

By admin | Updated: January 8, 2015 23:23 IST

करण जोहर रूपेरी पडद्यावर येण्यासाठी पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. येत्या वर्षात पाच मोठे चित्रपट त्याच्या ‘धर्मा प्रॉडक्शन’ या बॅनरखाली बनणार आहेत.

करण जोहर रूपेरी पडद्यावर येण्यासाठी पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. येत्या वर्षात पाच मोठे चित्रपट त्याच्या ‘धर्मा प्रॉडक्शन’ या बॅनरखाली बनणार आहेत. रणबीर कपूर, ऐश्वर्या राय-बच्चन, अनुष्का शर्मा, आलिया, सलमान, दीपिका अशी तगडी स्टारकास्ट त्याच्या चित्रपटांमध्ये काम करणार आहे. मात्र या पाच चित्रपटांपैकी एक चित्रपट करण स्वत: दिग्दर्शित करणार आहे. अनेक वर्षांनी त्याच्या चित्रपटाचा करिश्मा अनुभवण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. ‘आॅल द बेस्ट’ करण..!