Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ratris Khel Chale 3 शेवंता कधी येणार? या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल, तर लगेचच आपल्या फोनचा ब्राईटनेस वाढवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 19:45 IST

Ratris Khel Chale 3: ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील थरार, रहस्य या सगळ्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'शेवंता' परत येणार असल्याचे संकेत खुद्द 'शेवंता'नं म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिनं दिले होते.

पुन्हा एकदा ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या तिसऱ्या पर्व रसिकांच्या भेटीला आले आहे. याच निमित्ताने मालिकेतील ‘अण्णा’, ‘शेवंता’ आणि ‘माई’ ही मुख्य पात्र पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.या सगळ्यांमध्ये अधिक लोकप्रिय ठरली ती अपूर्वा नेमळेकरने साकारलेली ‘शेवंता’. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या अधिक चर्चेत आहे. ‘रात्रीस खेळ चाले 3’च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 

अण्णांच्या वाड्यात पुढे काय काय घडते? पाप, शाप आणि उ:शापचा हा प्रवास कुठपर्यंत जातो? शिवाय शेवंताची एन्ट्री होते की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे होणार आहे.दरम्यान ‘रात्रीस खेळ चाले 3’च्या पहिल्या भागाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. पहिल्या भागाने रसिकांची मनं जिंकली होती. त्यामुळे आगामी काळात मालिकेत रंजक वळणं पाहायला मिळणार हे पाहणे रंजक असणार आहे. दरम्यान शेवंताकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे. 

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील थरार, रहस्य या सगळ्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'शेवंता' परत येणार असल्याचे संकेत खुद्द 'शेवंता'नं म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिनं दिले होते. मात्र मालिका सुरु झाली तरी शेवंताचे दर्शन चाहत्यांना घडलेले नाही.

 

शेवंताला पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. त्यामुळे आता आणखी उत्सुकता ताणून न ठेवता लवकरच शेवंता रसिकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेच्या अधिकृत पेजवरच याविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच अपूर्वाच्या चाहत्यांना तिचे दर्शन घडणार हे मात्र नक्की.

कोकणातील रहस्यमय कथेची जोड आणि लोकांच्या मनावर छाप पाडून जाणाऱ्या भूमिका यांमुळे 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या दोन्ही सीझननं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. प्रेक्षकांच्या याच पसंतीनंतर आता या मालिकेचं तिसरं पर्व भेटीला आले. 

 

याआधीच्या सिझनमध्ये अण्णा नाईक या पात्राचा दरारा चांगलाच गाजला. तर शेवंतानं आपल्या सौंदर्य आणि अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अण्णा नाईक आणि शेवंता ही जोडी हिट ठरली होती. दोघांवर सोशल मीडियात जोरदार मिम्स देखील तयार केले गेले होते. 

टॅग्स :रात्रीस खेळ चाले ३अपूर्वा नेमळेकर