Join us

‘दुनियादारी’मधली सुरेखाही बोहल्यावर

By admin | Updated: March 3, 2016 02:29 IST

मराठी इंडस्ट्रीमध्ये सध्या ‘वेडिंग का सीझन है’ म्हणण्यास हरकत नाही. कारण मृणालपाठोपाठ आता रिचा परियालीही बोहल्यावर चढली आहे. अहो रिचा म्हणजेच आपली ‘दुनियादारी’मधली सुरेखा

मराठी इंडस्ट्रीमध्ये सध्या ‘वेडिंग का सीझन है’ म्हणण्यास हरकत नाही. कारण मृणालपाठोपाठ आता रिचा परियालीही बोहल्यावर चढली आहे. अहो रिचा म्हणजेच आपली ‘दुनियादारी’मधली सुरेखा ओ. हो, तीसुद्धा रौनक शहा यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे. दुनियादारी या चित्रपटातील रिचाची सुरेखा ही भूमिका फारच गाजली होती. याविषयी अभिनेत्री प्रिया मराठे हिने ‘लोकमत’ सीएनएक्सशी संवाद साधला असता. प्रिया म्हणाली, ‘खूप मजा आली. रिचाच्या लग्नाला जायला जमले नाही, पण रिसेप्शनला कांदिवली येथे पोहोचले, तसेच इंडस्ट्रीमधील मोजक्याच लोकांना तिने इनव्हाइट केले होते. मी खूप लकी की, मृणालपाठोपाठ रिचाच्याही लग्नात सहभागी होता आले.’ चला तर, रिचालाही लग्नाच्या शुभेच्छा देऊ या.