स र्वांना माहीतच आहे की, मसक्कली गर्ल सोनम कपूर जेव्हा चिडते तेव्हा ती समोर कोण आहे हे पाहत नाही. तिचा राग व्यक्त करायला सुरुवात करते. नुकत्याच झालेल्या प्रकारानुसार, एका अॅवॉर्ड फंक्शनसाठी सोनम आली असता ती रेड कार्पेटवरून चालत जात होती. नेहमीप्रमाणे पत्रकार तिचे बाइट्स घ्यायला पुढे येऊन गर्दी करू लागले. तेवढ्यात सोनमचा बाउन्सर तिथे आला आणि त्याने सोनमजवळून पत्रकाराला दूर ढकलले. तेव्हा सोनमचा रागाचा पारा चढला. आणि तिने सरळ जाऊन बाउन्सरलाच दूर ढकलून पत्रकाराची माफी मागायला लावली. त्यानंतर बाउन्सरने तिची आणि पत्रकाराची दोघांचीही माफी मागितली. वेल, सोनम कम डाऊन...!
जेव्हा सोनम चिडते...
By admin | Updated: February 27, 2016 03:36 IST