Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहिद कपूर आज चढणार बोहल्यावर

By admin | Updated: July 7, 2015 13:00 IST

अभिनेता शाहिद कपूर आज मीरा राजपूतसोबत लग्नगाठीत अडकणार आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - उत्तम नृत्यकौशल्यासोबतच आपल्या दमदार अभिनयामुळे रसिकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता शाहिद कपूर आज बोहल्यावर चढणार आहे. गुरगाव येथे होणा-या शानदार समारंभात शाहिद दिल्लीस्थित मीरा राजपूतशी विवाहबद्ध होणार आहे. या लग्न सोहळ्यास शाहिद-मीराचे कुटुंबिय आणि मोजकी जवळची मित्रमंडळी उपस्थित राहणार आहेत.
बॉलिवूडमधील शाहिदच्या इतर सहकलाकार मित्रांसाठी मुंबईत १२ जुलै रोजी शानदार रिसेप्शन आयोजित करण्यात आले असून अनेक स्टार्स या सोहळ्यास उपस्थित राहून शाहिद-मीराला शुभेच्छा देतील.