Join us

सलमान आपल्याच बॉड़ीगार्डला थप्पड मारतो तेव्हा...

By admin | Updated: February 5, 2016 12:40 IST

बॉलीव्हिजन डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार सलमान खानने त्याच्या शरीररक्षकालाच थप्पड लगावली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - कुठल्या ना कुठल्या वादांमुळे चर्चेत राहणारा सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बॉलीव्हिजन डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार सलमान खानने त्याच्या शरीररक्षकालाच थप्पड लगावली आहे. बॉलीव्हिजनच्या वृत्तानुसार त्यांचा प्रतिनिधी तिथं उपस्थित होता आणि त्यानं स्वत: हा प्रसंग बघितला आहे.
सलमान खान प्रिती झिंटा व सुसान रोशनबरोबर पार्टीमध्ये होता. त्यानंतर त्यानं या दोघींना त्यांच्या कारपर्यंत नेऊन सोडलं. त्यानंतर तो चाहत्यांच्या व पत्रकार - फोटोग्राफर्सच्या गराड्यात सापडला. हा प्रकार घडताच सलमान वळला आणि त्यानं एका बॉडीगार्डला थप्पड मारली. 
सलमानच्या बाऊन्सरने प्रसारमाध्यमांच्या छायाचित्रकारांना ढकलण्याचा प्रयत्न केला होता. याआधी एका वर्षापूर्वी सलमानच्या व फोटोग्राफर्सच्या मध्ये धक्काबुक्की झाली होती आणि फोटोग्राफर्स असोसिएशनने सलमानवर बॉयकॉय टाकला होता. असा प्रकार पुन्हा व्हावा अशी सलमानची साहजिकच इच्छा नाहीये. त्यानंतर सलमानने फोटोग्राफर्सना विनंती केली प्रत्येक संध्याकाळी त्याचा पिच्छा पुरवू नये आणि त्याला खासगी आयुष्य उपभोगायची संधी द्यावी.