जो हीरो तुमचा फेव्हरेट आहे तोच तुमच्या समोर आला तर तुम्ही काय कराल? आनंदाने भान राहणार नाही. असाच प्रकार परिणीतीच्या बाबतीतही घडला. परिणीतीने एका मुलाखतीत बोलताना सांगितले की, मी २००९ मध्ये बहीण प्रियंका चोप्रासोबत मुंबईत आले. मी जेव्हा स्टुडिओच्या गेटबाहेर आले तर मी कोणाला तरी फोनवर बोलताना पाहिले. जेव्हा तो व्यक्ती माझ्याकडे वळला, तेव्हा मी आश्चर्यचकित झाले कारण तो सैफ अली खान होता. माझा फेव्हरेट अभिनेता पाहून मी बेशुद्ध पडले. ही घटना तिने सैफला जेव्हा सांगितली तेव्हा तिला वाटले की, तो परेशान होईल. मात्र, तसे झाले नाही.
जेव्हा परिणीती पाहते ‘सैफ’ला!
By admin | Updated: July 3, 2015 00:54 IST