Join us

जेव्हा सैफ आणि रणबीर बनले 'शेफ'...

By admin | Updated: February 18, 2017 15:59 IST

कपूर घराण्याच्या गेट-टुगेदरमध्ये रणबीर कपूर आणि सैफ अली खानने एकत्र जेवण बनवले.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १८ - 'कपूर' घराणं म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीचा चालताबोलता इतिहास... पृथ्वीराज कपूर यांच्यापासून ते सध्याचा रॉकस्टार रणबीर कपूर पर्यंत सर्वच जण चित्रपटसृष्टीशी जोडलेले आहेत. त्यामुळे चार पिढ्यांच्या या घराण्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते. नुकताच अभिनेते रणधीर कपूर यांचा ७० वा वाढदिवस पार पडला, त्यांच्या मुली करिश्मा आणि करीना यांनी वाढदिवसासाठी खास पार्टीही आयोजित केली होती. त्या सेलिब्रेशनमध्ये अमिताभ बच्चन, राकेश रोशन, रेखा यांच्यापासून सैफ, रणबीर, मलायका अरोरापर्यंत बरेच जण सहभागीही झाले. या पार्टीचे फोटोही सोशल मीडियावर फिरत होते आणि ते पाहून चाहतेही नक्कीच खूप खुश झाले असतील. 
एवढेच नव्हे तर सोशल मीडियावर सक्रिय असणा-या करीश्माने आणखी काही फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले. ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्या घरी कपूर घराण्याची नवी पिढी जमली होती. विशेष म्हणजे तिथे रणबीर आणि त्याचे जिजू, अर्थात सैफ अली खान 'शेफ' बनून  कूकिंग करताना दिसत आहेत. तर करिश्मा आणि करीना मस्त फोटोसाठी पोज करताना दिसत आहेत. महत्वाचे म्हणजे या गेट-टुगेदरसाठी करिश्माचा सध्याचा प्रियकर संदीपही उपस्थित होता असे समजते. यामुळे ते दोघे लवकरच आपली रिलेशनशिप ऑफिशअल करणार असल्याची चर्चा आहे.