Join us
Daily Top 2Weekly Top 5

माला सिन्हा यांनी न्यायालयात दिली होती कबुली, वेश्याव्यवसायातून कमावलाय पैसा, वाचा काय आहे प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 15:45 IST

या घटनेची त्या काळात प्रचंड चर्चा झाली होती. 

ठळक मुद्देमाला सिन्हा अनेक सुपरहिट चित्रपट देत असल्याने त्यांच्याकडे प्रचंड पैसा होता.

माला सिन्हा यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला होता असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खूपच चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आले आहे. पण त्यांच्या आयुष्यातील एक घटना ऐकून तुम्हाला सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल. चक्क न्यायालयात मी वेश्याव्यवसाय करते असे त्यांनी सांगितले होते. त्या घटनेची त्या काळात प्रचंड चर्चा झाली होती. 

माला सिन्हा अनेक सुपरहिट चित्रपट देत असल्याने त्यांच्याकडे प्रचंड पैसा होता. पण त्या त्यांचे वडील अल्बर्ट सिन्हा यांच्याप्रमाणे प्रचंड कंजुष होत्या. पैसा वाचवण्यासाठी घरातील सगळी कामं देखील त्या स्वतः करायच्या. त्या एक प्रसिद्ध अभिनेत्री असल्या तरी त्यांच्या घरी नोकर नव्हते. 

माला सिन्हा यांच्या घरावर एकदा इन्कम टॅक्सचा छापा पडला होता. या छाप्यात त्यांच्या बाथरूमच्या टाईल्समधून 12 लाख रुपये मिळाले होते. ही गोष्ट न्यायालयात गेल्यानंतर काहीही करून त्यांना हे पैसे गमवायचे नव्हते. त्याकाळात 12 लाख रुपये ही खूपच मोठी रक्कम होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या वडिलांच्या आणि वकिलाच्या सल्ल्यानुसार न्यायालयात लिहून दिले होते की, त्यांनी हा पैसा वैश्याव्यवसायातून कमावला आहे. 

टॅग्स :माला सिन्हा