महेश भट यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. चित्रपटांइतकेच महेश भट त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम वाद ओढवून घेणारे महेश भट एकदा अशाच एका मोठ्या वादात अडकले होते. होय, करिअरच्या अगदी पिकवर असताना ८०च्या दशकात महेश भट यांच्या एका खळबळजनक किस्स्याने संपूर्ण बॉलिवूडच्या भुवया उंचावल्या होत्या. तेव्हा त्यांची मोठी लेक पूजा भट सुद्धा बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून खूप लोकप्रिय होती.
याच दरम्यान एका मॅगझिनच्या कव्हर पेजवर महेश भट व त्यांची मुलगी पूजा भट या दोघांचा एकमेकांना लिप लॉक करतानाचा फोटो प्रसिद्ध झाला होता. हा फोटो प्रसिद्ध झाला आणि मोठे वादंग उठले. बापाचा मुलीसोबतचा लिपलॉक करतानाचा फोटो पाहून सगळीकडे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. वाद अंगलट येत असल्याचे दिसताच महेश भट यांनी एक पत्रकार परिषद बोलवली. पण हे काय, या पत्रकार परिषदेत ते असे काही बोलले की, सगळ्यांनाच धक्का बसला.