Join us

प्रीती चढणार बोहल्यावर?

By admin | Updated: November 25, 2015 02:18 IST

अनेक वर्षांपासून बॉलीवूडची ‘बबली गर्ल’ प्रीती झिंटाच्या लग्नाची चर्चा चालू आहे. सध्या केवळ आयपीएल टीममुळे ती प्रसिद्धीझोतात असते

अनेक वर्षांपासून बॉलीवूडची ‘बबली गर्ल’ प्रीती झिंटाच्या लग्नाची चर्चा चालू आहे. सध्या केवळ आयपीएल टीममुळे ती प्रसिद्धीझोतात असते. तिच्या चाहत्यांना मनोमन वाटत होते की ती लाँग टर्म बॉयफ्रेंड नेस वाडियासोबत लग्न करेल. मात्र त्यांचे ब्रेक अप झाले आणि प्रीती पुन्हा एकटी पडली. गेल्या एक वर्षापासून ती जीन गुडनोहसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात दोघे लग्न करणार असल्याची चर्चा आहे. जीन मूळचा अमेरिकेतील असून तो लॉस एंजिलिसमध्ये फायनान्शियल अनॅलिस्ट आहे. प्रीतीचा भाऊ अमेरिकेत राहतो. त्याला भेटायला ती गेली असता त्यांची भेट झाली. तिच्या जवळच्या सूत्रांनुसार लग्न अमेरिकेत होणार असून लवकरच प्रीती याबाबत अधिकृत घोषणा करेल.