तरुणींचा लाडक्या चिन्मयची ‘नांदा सौख्य भरे’ मालिकेद्वारे ‘आॅनस्क्रीन’ लगीनघाई सुरू असली, तरी रिअल लाइफमध्येही तो २७ डिसेंबर रोजी अभिनेत्री गिरिजा जोशीसोबत विवाह बंधनात अडकणार आहे. ही ‘गुड न्यूज’ त्याने स्वत:च शेअर केली आहे. ‘वाजलाच पाहिजे गेम की सिनेमा’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील अभिनेत्री गिरिजा जोशी हिच्यासमवेत तो बोहल्यावर चढणार आहे. याच चित्रपटाच्या सेटवर या दोघांचे सूर जुळले व त्याचे रूपांतर आता विवाहात होणार आहे. लगीनघाईबाबत विचारले असता, विवाहाची तारीख जवळ आली आहे, पण व्यस्त शेड्युलमुळे चिन्मयची काहीच तयारी झाली नसल्याचे तो सांगतो. लग्नाची सर्व तयारी घरचे व गिरिजाच पाहत आहे, तसेच लग्नाच्या बंधनात वगैरे अडकणार नाही, हे माझ्यासाठी बंधन नसून एक चांगली भावना आहे. गिरिजा एक खूप चांगली मुलगी आहे. ती मला समजून घेते. आम्ही दोघेही एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करत नाही. एकमेकांना स्पेस देतो. ती माझ्या आयुष्यात आली, हे मी माझ भाग्य समजतो. चला तर मग, चिन्मयला देऊया त्याच्या भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा.
चिन्मय उद्गीरकर रिअल लाइफमधेही बोहल्यावर
By admin | Updated: December 16, 2015 01:22 IST