Join us

...तेव्हा आमिरला फुटला होता घाम!

By admin | Updated: June 24, 2017 01:23 IST

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान याचे सर्व चित्रपट वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यातील बरेचसे चित्रपट असे आहेत

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान याचे सर्व चित्रपट वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यातील बरेचसे चित्रपट असे आहेत, की ज्यामध्ये अंगप्रदर्शन न करताही या चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर कोट्यवधी रुपयांची लयलूट केली आहे. वास्तविक आमिर स्वत:च अभिनयाला विशेष महत्त्व देत असल्याने त्याच्या चित्रपटात हॉट सीन्स अपवादानेच बघावयास मिळतात. मात्र ज्या काही चित्रपटांमध्ये त्याने हॉट सीन्स (किसिंग सीन) दिले आहेत, ते करताना त्याला अक्षरश: घाम फुटला होता, असा खुलासा समोर येत आहे. ‘राजा हिंदुस्तानी’, ‘दिल’, ‘इश्क’, ‘मन’, ‘रंग दे बसंती’, ‘थ्री इडियट’ या चित्रपटांमध्ये आमिरने लिप लॉक सीन्स दिले आहेत. वास्तविक सद्यस्थितीचा विचार केल्यास चित्रपटांमध्ये लीप लॉक सीन्स ही बाब कॉमन आहे. मात्र आमिरच्या या सीन्सची आजही चर्चा रंगत असल्याने प्रत्येकाला त्याविषयी जाणून घेण्याची इच्छा आहे. कारण पडद्यावर हे सीन्स बघून आमिरच्या छबीविरुद्ध वाटत असले तरी, त्यालादेखील असे सीन्स देण्यात काहीच वावगे वाटत नसावे असेच एकंदरीत दिसते. मात्र अभिनेत्री पूजा बेदी हिने आमिरच्या किसिंग सीन्सविषयी केलेला खुलासा धक्कादायक आहे. कारण तिच्या मते हे सीन्स देताना आमिरची हालत प्रचंड खराब झाली होती. त्याला अक्षरक्ष: घाम फुटला होता. जेव्हा जेव्हा त्याने अशाप्रकारचे सीन्स दिले तेव्हा तेव्हा त्याने सेटवरून पळ काढला होता.