Join us

नायरा बॅनर्जी आणि करण खन्नाची ऑफस्क्रिन केमिस्ट्री चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 06:30 IST

उत्कंठा वाढवणारे कथानक आणि दिग्गज कलाकारांचा दर्जेदार अभिनय यामुळे ‘स्टार प्लस’वरील ‘दिव्य दृष्टी’ या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.

ठळक मुद्देमालिकेतील या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे

उत्कंठा वाढवणारे  कथानक आणि दिग्गज कलाकारांचा दर्जेदार अभिनय यामुळे ‘स्टार प्लस’वरील ‘दिव्य दृष्टी’ या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. मालिकेत दिव्या या नायिकेची भूमिका साकारत असलेली नायरा बॅनर्जी हि आणि करण खन्ना गेल्या सात वर्षांपासूनचे मित्र आहेत. मालिकेतील या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार “नायरा आणि करण यांच्यात पडद्यामागेही घनिष्ठ मैत्रीचे नाते आहे. दोघेही सेटवर एकत्र येतात.

नायरा या मैत्रीबाबत बोलताना म्हणाली, “मी आता गेल्या आठ वर्षांपासून त्याला ओळखते आणि तो मला आवडतो. आम्हाला एकत्र चित्रीकरण करताना मजा येते आणि अजूनही आम्ही एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत.” नीरा सांगते, “आमच्यातील नातं फारच सुंदर असून त्यामुळेच सेटवर वातावरण मस्त असतं.”

करण खन्ना सांगतो, “नायरा या मालिकेत माझी सह-कलाकार आहे, हे कळल्यावर मला खूपच आनंद होता. तिच्याबद्दलची आपुलकी आता इतक्या वर्षांनंतर अधिकच वाढली आहे. आता दिव्य शक्ती मालिकेत त्याच्यासोबत काम करायला मला खूप मजा येतेय. 

दिव्य दृष्टी मालिकेतून संगीता घोष पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय. दिव्य दृष्टी मालिकेत संगीता पिशाचिनी या खलनायिकेची भूमिका साकारणार आहे.  दिव्य दृष्टी ही मालिका अंगी विशेष शक्ती असलेल्या दोन बहिणींची कथा आहे. दृष्टीकडे भविष्यात काय घडणार आहे, ते पाहण्याची शक्ती आहे; तर या भविष्यात बदल करण्याची शक्ती दिव्याकडे आहे. 

 

टॅग्स :स्टार प्लसटिव्ही कलाकार