बॉलिवूडच्या सौंदर्यवती अभिनेत्री रेखा या कित्येक दशकांपासून सिनेइंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवत आहेत.पन्नास वर्षांच्या करियरमध्ये त्यांनी जवळपास १८० चित्रपटात काम केले आहे. रेखा यांनी ६०च्या दशकात आपल्या सिने कारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.रेखा यांचे सिनेकारकीर्दीसोबतच खासगी आयुष्य वादग्रस्त ठरले होते. रेखा कोणाच्या नावाने सिंदूर लावते हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतात. रेखाची सेक्रेटरी फरजानामुळे सुद्धा लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित राहिले होते.
रेखा आणि फरजाना यांच्यामध्ये कोणते नाते आहे हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक होते. फरजाना गेल्या ३२ वर्षांपासून रेखा यांच्यासोबत आहे. मोहनदीप नावाच्या पत्रकाराने त्यांच्या पुस्तकामध्ये रेखा यांची सेक्रेटरी फरजानाबद्दल बरेच काही लिहिले आहे. या पुस्तकानुसार रेखाचे तिची सेक्रेटरी फरजानासोबत खूप जवळचे नाते आहे.
या गोष्टींमध्ये किती सत्यता आहे हे आम्हाला ठाऊक नाही. पण रेखा तिच्या सेक्रेटरी फरजानाला आपली बहिण मानते.