Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय म्हणतात कंगनाबद्दल 'तिचे' वडील

By admin | Updated: May 5, 2016 16:06 IST

अभिनेत्री कंगना राणावतसाठी सध्या खडतर काळ सुरु आहे. अभिनेता हृतिक रोशन बरोबर सुरु असलेल्या कायदेशीर लढाईमध्ये तिच्या वाटयाला बदनामीच अधिक येत आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ५ - अभिनेत्री कंगना राणावतसाठी सध्या खडतर काळ सुरु आहे. अभिनेता हृतिक रोशन बरोबर सुरु असलेल्या कायदेशीर लढाईमध्ये तिच्या वाटयाला बदनामीच अधिक येत आहे. या सर्व परिस्थितीत कंगनाचे वडील मात्र तिच्या मागे भक्कमपणे उभे राहीले आहेत. 
 
आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात कंगनाने धाडस दाखवले त्याबद्दल मला तिचा अभिमान वाटतो असे अमरदीप राणावत यांनी सांगितले. 'तनू वेडस मनू' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी कंगना दिल्लीत आली होती. त्यावेळी सर्व कुटुंबियांबरोबर तिचे वडीलही आले होते. 
 
मुलीने कमावलेले यश आणि हृतिक बरोबर सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना अमरदीप म्हणाले की, माझ्या मुलीने जे कमावले आहे त्याबद्दल मला तिचा अभिमान आहे. तिने आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात धाडस दाखवले आणि तिच्या कायदेशीर लढाईमध्ये मी भक्कमपणे तिच्या मागे उभा आहे. आज विद्या बालननेही कंगनाला पाठिंबा दिला. कंगनाचा आदर वाटत असल्याचे विद्याने सांगितले. 
 
ह्रतिकचा सिली एक्स असा उल्लेख
 
कंगनाने हृतिकचा 'सिली एक्स' असा उल्लेख केल्यानंतर या कायदेशीर लढाईला सुरुवात झाली होती. कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनीच हा फोटो व्हायरल केल्याचीदेखील चर्चा आहे. कंगनाची बहिण रंगोलीने हृतिकला 25 मे 2014 ला मेल पाठवून बनावट मेल आयडीची संयुक्त तक्रार करण्याच आवाहन केलं असतानादेखील हृतिकने तक्रार का केली नाही ? असा सवाल रिझवान सिद्दीकी यांनी उपस्थित केला आहे.