Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत आल्यावर प्रथम डिप्पीने काय केले?

By admin | Updated: June 4, 2016 00:58 IST

चार महिन्यांपासून घरापासून दूर राहत असलेली दीपिका पदुकोन अखेर मुंबईत परतली. कॅनडात ती चित्रपटाची शूटिंग करत असल्याने भारतातील जेवण, वातावरण सगळंच ती मिस करत होती

चार महिन्यांपासून घरापासून दूर राहत असलेली दीपिका पदुकोन अखेर मुंबईत परतली. कॅनडात ती चित्रपटाची शूटिंग करत असल्याने भारतातील जेवण, वातावरण सगळंच ती मिस करत होती. मात्र, मुंबईत आल्यानंतर सर्वप्रथम तिने काय केले असेल? तर सर्वांत चांगल्या कुकला बोलावून छानपैकी लंच आॅर्डर केला. थोडासा निवांतपणा मिळावा म्हणून तिने तिच्या टीम मेंबर्ससाठी स्पेशल लंच आयोजित केला होता. वरळी येथील तिच्या राहत्या घरी तिने लॅव्हिश लंच पार्टी आयोजित केली. हा प्लेझर-कम-बिझनेस लंच हा होता. दीपिका तिचा आगामी हॉलीवूडपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ साठी ’ सध्या खुप उत्सुक आहे. तसेच ती बुडापेस्टमध्ये ‘राब्ता’ मधील एका गाण्यासाठी देखील शूटींग करते आहे.