Join us

‘वेल प्लॅनर’ नेहाची मालिकेतही धमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2015 00:01 IST

झेंडा, स्वप्न तुझे नि माझे, पोश्टर बॉईज अशा मराठी, तर जब लव्ह हुआ अशा हिंदी चित्रपट व सध्या सुरू असलेल्या एका मालिकेत खडूस मात्र स्पष्टवक्ती ओळख असलेली

झेंडा, स्वप्न तुझे नि माझे, पोश्टर बॉईज अशा मराठी, तर जब लव्ह हुआ अशा हिंदी चित्रपट व सध्या सुरू असलेल्या एका मालिकेत खडूस मात्र स्पष्टवक्ती ओळख असलेली रजनी म्हणजेच- नेहा जोशी. नाटक, मालिका, चित्रपट अशा तीनही क्षेत्रात तिने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. नुक तेच ती ‘ड्रीम रोल’ या चित्रपटात मुख्य भूमिकेतही पाहायला मिळाली. ती पुन्हा एकदा दोन मोठ्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. एक ‘लालबागची राणी’, तर दुसरा आहे ‘रेडीमेड’. खरं तर मालिकेत काम करताना कलाकार चित्रपटाला वेळ देऊ शकत नाहीत किंवा चित्रपटात काम करताना मालिका किंवा नाटकाला पाहिजे तितका वेळ देऊ शकत नाहीत, पण ही पठ्ठी सध्या मालिकेतही काम करताना दिसतेय आणि एक नाही तर दोन चित्रपटांमध्ये तितक्याच मेहनतीने आणि वेळ देऊन काम करतेय. त्यामुळे तिला वेल प्लॅनर असेच म्हणावे लागेल.इतकी मेहनत घेणाऱ्या नेहाचे दोन्ही चित्रपट नक्कीच यशस्वी होतील हे काही वेगळं सांगायला नको.