Join us

‘वेल डन भाल्या’चा टे्रलर रीलिज

By admin | Updated: January 24, 2016 01:49 IST

क्रिकेट हा खेळ असा आहे की, भारतातील प्रत्येक घरातील प्रत्येक माणसाला या खेळाची माहितीही आहे आणि आवडही आहे. मग तो आदिवासी भाग का असेना. अशाच क्रिकेटच्या

क्रिकेट हा खेळ असा आहे की, भारतातील प्रत्येक घरातील प्रत्येक माणसाला या खेळाची माहितीही आहे आणि आवडही आहे. मग तो आदिवासी भाग का असेना. अशाच क्रिकेटच्या वेडाने झपाटलेल्या एका आदिवासी मुलावर ‘वेल डन भाल्या’ हा चित्रपट येत असून, नुकताच त्याचा टे्रलर रीलिज करण्यात आला. नितीन कांबळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, चैताली आणि अमोल काळे यांनी निर्मिती केली आहे. तर नितीन सुपेकर यांनी कथा लिहिली आहे. क्रिकेटमध्ये लक्ष्यवेधी कामगिरी करणाऱ्या गावातील इतर मुलांपुढे आदर्श ठेवणाऱ्या या आदिवासी मुलाची प्रमुख भूमिका नंदू सोळकर या बालकलाकाराने साकारली असून, त्याच्यासोबत रमेश देव, अलका कुबल, गणेश यादव, संजय नार्वेकर, मिताली जगताप, अंशुमन विचारे, शरद पोंक्षे, संजय खापरे आदी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.