Join us
Daily Top 2Weekly Top 5

'वेलकम' फेम सुप्रिया कर्णिक यांची नवऱ्यानेच केली होती फसवणूक, लग्नानंतर १२ दिवसांतच पैसे घेऊन पळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 14:51 IST

सुप्रिया कर्णिक यांची क्रेझ आजही आहे, त्यात काही वाद नाही.

अभिनेता अक्षय कुमारचा 'वेलकम' हा चित्रपट अनेकांच्या लक्षात असेल. अक्षय कुमार, कतरिना कैफ, नाना पाटेकर, अनिल कपूर आणि परेश रावल हे दिग्गज कलाकार या चित्रपट महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. याच चित्रपटातील अक्षयची 'मामी' तुम्हाला आठवतेय ना. या अभिनेत्रीचे नाव आहे सुप्रिया कर्णिक (Supriya Karnik). सुप्रिया अनेक हिंदी सिनेमा आणि मालिका झळकल्या आहेत. पण, तुम्हाला माहितेय सुप्रिया यांची त्यांच्या नवऱ्यानेच मोठी फसवणूक केली होती. 

खूप कमी लोकांना माहिती असेल मराठमोळ्या अभिनेत्री सुप्रिया कर्णिक या मुळच्या मुंबईमधल्या. सुप्रिया कर्णिक मुंबईत लहानाच्या मोठ्या झाल्या. आई-वडिल आणि दोन बहिणी असं त्याचं कुटुंब. कलाविश्वात येण्यापूर्वी सुप्रिया यांनी टायपिस्ट, सेक्रेटरी, कार रिपेअर, शेअर मार्केट, रिअल इस्टेट अशा अनेक क्षेत्रांमध्ये काम केलं आहे. इतकंच नाही तर तिने सौदी अरेबियामध्ये एअर हॉस्टेसचं काम केल्याचही सांगण्यात येतं. मुंबईत परतल्यानंतर त्यांनी एका मैत्रिणीच्या सल्लाने मॉडेलिंगमध्ये नशीब आजमवण्याचं ठरवलं. 

मालिकांमधून कामाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी अनेक सिनेमात कामं केलं आणि अभिनय क्षेत्रात नाव कमावलं. पण, वैयक्तिक आयुष्यात त्यांना अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला.  दैनिक भास्करच्या वृत्तानुसार सुप्रिया या एका लक्ष्मीकांत नायडू नावाच्या एका व्यक्तीच्या प्रेमात पडल्या होत्या. २९ मार्च २०१२ रोजी दोघांनी लग्न केलं. मात्र, लग्न झाल्याच्या १० दिवसांमध्ये सुप्रिया यांचा पती घरातून गायब झाला. ऐवढचं नाही तर जाताना त्याने घरातील ३५ हजार रुपयेदेखील नेले, असा दाव सुप्रिया यांनी केला होता. 

सुप्रिया यांनी पोलिसांत धाव घेतली होती. मात्र, नायडू यांच्या कुटुंबीयांना त्यांचं लग्न मान्य केलं नाही. अशावेळी सुप्रिया यांनी लग्नाचे पुरावेदेखील पोलिसांकडे जमा केले होते.  सुप्रिया यांचा पती अनेक दिवस गायब होता. एका मुलाखतीमध्ये बोलताना सुप्रिया म्हणाल्या, मी अनेकवेळा प्रेमात पडले. पण, प्रेमात माझी फसवणूक झाली. ज्यांनी माझी फसवणूक केली. त्या व्यक्तींना चोप दिल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवाय पुन्हा असं कोणत्या मुलीसोबत करशील तर याद राख, अशी ताकीदही दिली होती. 

सुप्रिया कर्निक अजूनही सिंगल आहेत. लग्नाचा विषयच त्यांनी बाजूला केला. सुप्रिया सध्या अध्यात्माकडे वळल्या आहेत. अभिनयासोबतच अनेक तरुण-तरुणींना त्या अध्यात्माचे धडे देतात. शिवाय, त्या अभिनयातही सक्रीय आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'लग्नकल्लोळ'  सिनेमात त्या झळकल्या होत्या. परदेस, ताल, जिस देश में गंगा रहता है, यादे, राजा हिंदुस्तानी, तुझे मेरी कसम, मुझसे शादी करोगी, आर्यन, वेलकम, दे दना दन, वेलकम बॅक अशा जवळपास ५० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये सुप्रिया झळकल्या आहेत.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीमराठी अभिनेताअक्षय कुमार