Join us

प्रसिद्ध अभिनेत्याचा जंगलात आढळला मृतदेह, वयाच्या २७ व्या वर्षी अकस्मात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 15:18 IST

आधी एका महिलेची तक्रार, पोलिसांनी केला पाठलाग; आता थेट जंगलातच आढळला मृतदेह

'येलोस्टोन 1923' या गाजलेल्या वेबसीरिजमधील अभिनेता कोल ब्रिंग्स प्लेंटीचं (Cole Brings Plenty) निधन झालं आगे. जंगलात त्याच्या मृतदेह आढळून आला. गेल्या काही दिवसांपासून कोल गायब होता. त्याच्या कुटुंबानो पोलिसात तक्रारही केली होती. त्याचं वय केवळ 27 वर्ष होतं. जंगलात एका गाडीजवळ कोलचं पार्थिव आढळून आलं. 

कैनसस पोलिसांच्या रिपोर्टनुसार, गेल्या आठवड्यात एप्रिलच्या सुरुवातीला एका अपार्टमेंटमधून महिला मदतीसाठी ओरडत होती. यानंतर पोलिस अभिनेता कोलच शोध घेत होते. कारण जोपर्यंत पोलिस महिलेजवळ पोहोचले तोवर कोल तिथून पळाला होता. कोल शहरातील ट्रॅफिक कॅमेऱ्यांमध्येही कैद झाला. कोलच्या अटकेसाठी प्रयत्न सुरु झाले. मात्र आता त्याचा मृतदेह जंगलात आढळून आला आहे. यामुळे ही केस अगदीच गुंतागुंतीची बनली आहे. पोलिस तपास करत आहेत.अभिनेता कोलचे काका मोझेस ब्रिंग्स यांनी सोशल मीडिया पोस्ट करत त्याच्या मृत्यूची बातमी दिली.

कोल प्लेंटीने 1923 सीरिजमध्येपीट प्लेंटी क्लाऊड्सची भूमिका साकारली होती. ही सीरिज येल्लोस्टोनची प्रीक्वल होती. तर त्याचे काका मोझेस प्लेंटी हे देखील अभिनेते आहेत. त्यांनीही येल्लोस्टोन मध्ये मो ही भूमिका साकारली होती. 

 

टॅग्स :मृत्यूसेलिब्रिटीहॉलिवूडवेबसीरिज