विजय वर्मा मुख्य भूमिकेत असलेल्या ‘मटका किंग’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलर १९६० च्या दशकातील वेगाने बदलणाऱ्या मुंबईची रंजक कथा दाखवतो. जिथे एक महत्त्वाकांक्षी कापूस व्यापारी अडचणींना सामोरे जात ‘मटका’ नावाचे धाडसी जुगार साम्राज्य उभे करतो आणि श्रीमंतांचा छंद संपूर्ण देशाला वेडं बनवतो.
ट्रेलर आपल्याला ब्रिज भट्टी (विजय वर्मा)च्या जगात घेऊन जातो. तो एक हुशार कापूस व्यापारी असून १९६० च्या दशकातील नव्या भारतातील मुंबईमध्ये चांगल्या आयुष्याचे स्वप्न पाहतो. एका दमदार कल्पनेच्या जोरावर तो जुगाराला श्रीमंतांच्या छंदातून मोठ्या चळवळीत बदलतो आणि ‘मटका’चा जन्म होतो. मात्र दांव जितका मोठा तितका धोका अधिक, आणि स्वप्न म्हणून सुरू झालेली गोष्ट सर्व काही उद्ध्वस्तही करू शकते. वेगवान आणि थरारक ट्रेलर महत्त्वाकांक्षा, सत्ता आणि त्याची किंमत यांची कथा सांगतो. ज्यात एकच प्रश्न उरतो: मटका किंगचे स्वप्न पूर्ण होणार की सर्व काही कोसळणार?
‘मटका किंग’मध्ये विजय वर्मा प्रमुख भूमिकेत असून कृतिका कामरा, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, भूपेंद्र जादावत आणि गुलशन ग्रोवरही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. याशिवाय भरत जाधव, गिरीश कुलकर्णी, जेमी लीवर, किशोर कदम, सायरस साहूकार, अर्पिता सेठिया, संभाजी तांगडे, इश्तियाक खान, संजीव जोटांगिया आणि सिमरन अश्विनी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अभय कोरान्ने लिखित या मालिकेची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन नागराज पोपटराव मंजुळे यांनी केले आहे. ही वेब सीरिज १७ एप्रिलपासून भारतासह जगभरातील २४० देश आणि प्रदेशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
विजय वर्मा म्हणाला, “‘मटका किंग’मध्ये काम करणे रोमांचक प्रवास होता. या काळाची पार्श्वभूमी आणि या व्यक्तिरेखेची मांडणी आव्हानात्मक होती पण समाधान देणारीही होती. निर्माते नागराज मंजुळे आणि अभय कोरान्ने यांनी मला ब्रिजच्या जगात खोलवर जाण्याची मुभा दिली. कृतिका, सई, गुलशन ग्रोवर आणि संपूर्ण कलाकारांसोबत काम करताना अनुभव अधिक खास बनला. ही कथा महत्त्वाकांक्षा, सत्ता आणि यशासाठी द्यावी लागणारी किंमत याबद्दल आहे".
नागराज पोपटराव मंजुळे म्हणाले, “‘मटका किंग’ हा केवळ कालखंडावर आधारित नाट्यप्रकार नाही. हा सन्मानासाठी झगडणाऱ्या आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रणाली बदलणाऱ्या व्यक्तीची कथा आहे. प्रत्येक दृश्यात त्या काळाचा अचूक आविष्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. १७ एप्रिलला प्रेक्षकांनी ही मालिका अनुभवावी अशी आमची इच्छा आहे.”
Web Summary : Vijay Varma's 'Matka King' trailer unveils 1960s Bombay, where a cotton trader creates a gambling empire. Bridge Bhatti transforms 'Matka' into a nationwide obsession. Co-starring Kritika Kamra and Sai Tamhankar, the series, directed by Nagraj Manjule, explores ambition and its cost, premiering April 17th.
Web Summary : विजय वर्मा का 'मटका किंग' का ट्रेलर 1960 के बॉम्बे को दर्शाता है, जहाँ एक कपास व्यापारी जुआ साम्राज्य बनाता है। ब्रिज भट्टी 'मटका' को राष्ट्रव्यापी जुनून में बदल देता है। कृतिका कामरा और सई ताम्हणकर सह-कलाकार, नागराज मंजुले द्वारा निर्देशित, यह श्रृंखला 17 अप्रैल को महत्वाकांक्षा और उसकी कीमत का पता लगाती है।