तीन महिन्यांपूर्वी OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली एक दमदार क्राइम थ्रिलर वेब सीरिज सध्या प्रचंड चर्चेत आहे. अनेक नव्या सीरिज आल्या-गेल्या, पण ही सीरिज अजूनही टॉप ट्रेंडमध्ये कायम आहे. नेटफ्लिक्सच्या टॉप १० यादीत गेल्या तीन महिन्यांपासून या सीरिजचा दबदबा पाहायला मिळतोय.
फक्त ७ एपिसोडमध्ये जबरदस्त ड्रामा, थ्रिल आणि सस्पेन्स भरलेला आहे. प्रत्येक एपिसोड इतका रोचक आहे की, एकदा सुरू केल्यावर पूर्ण सीरिज पाहिल्याशिवाय तुम्ही उठणार नाही. या सीरिजची कथा आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटविरोधातील मोठ्या लढाईवर आधारित आहे. एक प्रामाणिक कस्टम ऑफिसर आणि त्याची टीम एका अत्यंत शक्तिशाली सोन्याच्या तस्कराविरोधात मोहीम राबवतात. या धोकादायक मिशनमध्ये अनेक आव्हानं आणि त्यागही करावे लागतात.
आपण ज्या सीरिजबद्दल बोलत आहोत, ती म्हणजे 'तस्करी: द स्मगलर्स वेब'. या सीरिजमध्ये इमरान हाश्मी हा कस्टम ऑफिसरच्या भूमिकेत आहे. महत्त्वाचं म्हणजे मराठमोळा शरद केळकर यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. तसेच अमृता खानविलकरदेखील या सीरिजमध्ये पाहायला मिळते. तिने यामध्ये मिताली कामत ही भूमिका साकारली आहे.
याशिवाय, अनुराग सिंहा, जमील खान, फ्रेडी दारुवाल, जोया अफरोज, नंदिश सिंह सिंधू, सुमित निजवन अशी दमदार स्टारकास्ट आहे. १४ जानेवारी २०२६ रोजी रिलीज झालेली ही सीरिज आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. IMDb वर ७.१ रेटिंग मिळालेली ही सीरिज अजूनही टॉप १० मध्ये ट्रेंड होत आहे. जर तुम्ही अजून पाहिली नसेल, तर सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेली ही सीरिज नक्की पाहण्यासारखी आहे.
Web Summary : Crime thriller 'Smugglers Web' starring Emraan Hashmi, trending on OTT for three months, boasts a 7.1 IMDb rating. The series revolves around a customs officer's fight against a gold smuggling racket, filled with drama and suspense.
Web Summary : इमरान हाशमी अभिनीत क्राइम थ्रिलर 'स्मगलर्स वेब' तीन महीने से ओटीटी पर ट्रेंड कर रही है, जिसकी आईएमडीबी रेटिंग 7.1 है। यह श्रृंखला एक सीमा शुल्क अधिकारी द्वारा सोने की तस्करी रैकेट के खिलाफ लड़ाई के इर्द-गिर्द घूमती है, जो नाटक और रहस्य से भरी है।