अंगावर शहारे आणणारी कथा आणि तितकाच प्रभावी अभिनय यामुळे दिव्या दत्ताची मुख्य भूमिका असलेली 'चिरैया' (Chiraiya) ही वेबसीरिज सध्या चर्चेत आहे. या सीरिजमध्ये नकारात्मक भूमिका साकारणारा अभिनेता सिद्धार्थ शॉ (Siddharth Shaw) याला सध्या नेटकऱ्यांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, त्याला चक्क जिवंत मारण्याच्या धमक्या मिळत आहे. यावर सिद्धार्थने प्रतिक्रिया दिली आहे.
'चिरैया'मध्ये सिद्धार्थने एका अशा पतीची भूमिका साकारली आहे, जो आपल्या पत्नीच्या संमतीशिवाय तिच्यावर लैंगिक अत्याचार करतो. या भूमिकेमुळे प्रेक्षकांमध्ये त्याच्याबद्दल इतका संताप निर्माण झाला आहे की, त्याला थेट जिवंत मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. सिद्धार्थने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, "लोक मला मेसेज पाठवून म्हणतात की, "तुला एका निळ्या ड्रममध्ये टाकायला पाहिजे".
पुढे सिद्धार्थ म्हणतो, "मला इतका द्वेष पाहून आनंद होत आहे, कारण याचा अर्थ मी माझं काम प्रामाणिकपणे केलं आहे". दरम्यान, मेरठ भीषण हत्याकांडात एका महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली होती आणि त्याच्या मृतदेहाचे ३ तुकडे करून ड्रममध्ये सिमेंट व वाळू भरून सील केला होता.
वैवाहिक बलात्काराच्या गंभीर विषयावर भाष्य२० मार्च २०२६ रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झालेली ही सहा भागांची सीरिज 'मॅरिटल रेप' (Marital Rape) सारख्या गंभीर विषयावर प्रकाश टाकते. शशांक शाह दिग्दर्शित या ड्रामा थ्रिलरमध्ये सिद्धार्थच्या पत्नीची (पूजा) भूमिका प्रसन्ना बिष्ट हिने साकारली आहे. समाजात घडणाऱ्या या भयानक वास्तव्याला वाचा फोडण्याचे काम या सीरिजने केले आहे.
Web Summary : Siddharth Shaw, playing a negative role in 'Chiraiya,' faces death threats due to his portrayal of marital rape. He is compared to a murder victim, but appreciates the impact of his performance.
Web Summary : 'चिरैया' में नकारात्मक भूमिका निभाने वाले सिद्धार्थ शॉ को वैवाहिक बलात्कार के चित्रण के कारण जान से मारने की धमकी मिल रही है। उनकी तुलना एक हत्या के शिकार से की जा रही है, लेकिन वह अपने प्रदर्शन के प्रभाव की सराहना करते हैं।