Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पंचायत'चा विक्रम मोडीत! IMDb वर 'ही' सीरिज ठरली नंबर १; तुम्ही पाहिली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 14:45 IST

'या' वेबसीरिजनं IMDb च्या लोकप्रिय भारतीय टीव्ही शोच्या यादीत पहिला क्रमांक मिळवला, 'पंचायत'ला टाकलं मागे

नुकताच प्रदर्शित झालेला 'सपने व्हर्सेस एव्हरीवन' (Sapne Vs Everyone) चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या सीरिजनं IMDb च्या लोकप्रिय भारतीय टीव्ही शोजच्या यादीत नंबर १ चे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, या शोने अ‍ॅमेझॉन प्राईमच्या 'पंचायत' सारख्या ब्लॉकबस्टर वेबसीरिजलाही रेटिंगमध्ये मागे टाकले आहे.

'सपने व्हर्सेस एव्हरीवन'च्या या यशाचा आनंद साजरा करताना निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्टर शेअर केले आहे. "यावेळी 'ड्रीमर्स'नी खरोखरच मने जिंकली आहेत. हा शो पाहिल्याबद्दल आणि त्यातील प्रत्येक भावना अनुभवल्याबद्दल धन्यवाद" अशा शब्दांत निर्मात्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले. 


दरम्यान, या सीरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षक-समिक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. आयएमडीबीवर या सीरिजला १० पैकी ९.२ रेटिंग मिळाली होती. मोस्ट वॉच्ड सीरिजमध्ये समाविष्ट असलेल्या या वेब सीरिजचा नवीन सिझनसुद्धा प्रेक्षकांना खूप आवडतोय.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Sapne Vs Everyone' dethrones 'Panchayat' as IMDb's top Indian show.

Web Summary : The second season of 'Sapne Vs Everyone' has become a hit, topping IMDb's popular Indian TV shows list. It surpassed even the blockbuster web series 'Panchayat' in ratings. The creators thanked viewers for their support.
टॅग्स :वेबसीरिज