Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मटका किंग'मध्ये सई ताम्हणकरची नेमकी काय भूमिका? खुलासा करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 17:55 IST

सईनं नुकतंच मटका किंग'मधील तिच्या भूमिकेबद्दल खुलासा केलाय.

Sai Tamhankar  Matka King Role Barkha :  सध्या सगळीकडे 'मटका किंग' या वेबसीरिजची प्रचंड चर्चा आहे. या  सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या सीरिजचं लेखन, निर्मितीची बाजू सांभाळण्यासोबतच दिग्दर्शनही मराठमोळे नागराज मंजुळे यांनी केलं आहे. विजय वर्मा मुख्य भूमिकेत असलेल्या 'मटका किंग'मध्ये अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकरदेखील झळकली आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सईनं नुकतंच मटका किंग'मधील तिच्या भूमिकेबद्दल खुलासा केलाय.

'मटका किंग'मध्ये सई 'बरखा' ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारतेय.  आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सई म्हणाली, "बरखा ही एक अत्यंत जिद्दी आणि स्वतंत्र विचारांची महिला आहे. सहसा एखाद्याच्या पत्नीची भूमिका करताना ती केवळ 'पत्नी' म्हणूनच ओळखली जाईल असा समज असतो. पण बरखाची स्वतःची एक दुनिया आहे. तिची स्वतःची विचारसरणी आहे, जी ती ठामपणे मांडते". सीरिजमध्ये विजय वर्माने 'ब्रिज भट्टी'ची भूमिका साकारली आहे. आपल्या पतीच्या प्रचंड लोकप्रियतेखाली किंवा पैशांच्या दडपणाखाली बरखा दबून जात नाही, हे या पात्राचं वैशिष्ट्य असल्याचं सईने नमूद केलं

सई पुढे म्हणाली, "सुरुवातीला ती पतीच्या ग्लॅमर आणि पैशांकडे आकर्षित होते, पण हळूहळू ती स्वतःचा मार्ग शोधू लागते. तिचा बाहेरून सुरू झालेला हा प्रवास स्वतःच्या शोधापर्यंत कसा पोहोचतो, हे पाहणं रंजक आहे. तिच्यातील हा बदल मला खूप भावला".

'मटका किंग' ही सीरिज अभय कोराने यांनी निर्मित व लिखित केली आहे. या सीरिजमध्ये विजय वर्मा आणि सई ताम्हणकरशिवाय, सिद्धार्थ जाधव, कृतिका कामरा आणि गुलशन ग्रोवर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच भरत जाधव, गिरीश कुलकर्णी, किशोर कदम आणि जेमी लीवर यांसारखी तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

कधी होणार प्रदर्शित?

अंडरवर्ल्ड आणि मटका व्यवसायाची पार्श्वभूमी असलेली ही बहुचर्चित सीरिज १७ एप्रिल रोजी प्राइम व्हिडीओवर भारत आणि जगभरातील २४० देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ही सीरिज एका अशा जगात घेऊन जाते, जिथे 'मटका' हा फक्त जुगार नसून सत्ता, गणित, मानसशास्त्र आणि सामाजिक वास्तव यांचा गुंता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sai Tamhankar reveals her role in 'Matka King' web series.

Web Summary : Sai Tamhankar plays Barkha in 'Matka King,' a determined woman with independent views. She initially attracted glamour, but finds her own path, distinguishing herself beyond her husband's fame. Series releases April 17th.
टॅग्स :सई ताम्हणकर