Join us

'पाताललोक 2' विषयी दिग्दर्शकांचा मोठा खुलासा; अशी असेल या सीरिजची स्टोरी

By शर्वरी जोशी | Updated: November 9, 2023 16:54 IST

Patala lok 2: पाताललोक 2 च्या दिग्दर्शकांनी या सीरिजविषयी 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

सध्याच्या काळात सिनेमांपेक्षा प्रेक्षक वेबसीरिजला जास्त पसंती देत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेक नव्या धाटणीच्या, नव्या आशयाच्या वेबसीरिजची निर्मिती झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातलीच एक सीरिज म्हणजे 'पाताललोक’ (Paatal Lok). अनुष्का शर्माने तिच्या भावासोबत कर्णेश शर्मासोबत या सीरिजची निर्मिती केली होती. २०२० मध्ये प्रदर्शित झालेली ही सीरिज तुफान गाजली. त्यामुळे प्रेक्षक या सीरिजच्या दुसऱ्या पार्टची आतुरतेने वाट पाहत होते. विशेष म्हणजे या सीरिजचा दुसरा पार्ट लवकरच येणार आहे. तत्पूर्वी सीरिजचे दिग्दर्शक अविनाश अरुण यांनी 'लोकमत फिल्मी'सोबत संवाद साधतांना एक मोठा खुलासा केला आहे.

'पाताललोक' गाजल्यानंतर त्याच्या दुसऱ्या पार्टची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. हा दुसरा भाग कधी रिलीज होणार, त्याचं कथानक काय असेल, कोणते कलाकार असतील असे कितीतरी प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. त्यातील कथानकाविषयी दिग्दर्शक अविनाश अरुण यांनी उत्तर दिलं आहे. 'पाताललोक 2' चं सगळं चित्रीकरण व्यवस्थित पार पडलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. ही सीरिज पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.

"पातललोक  2 चं सगळं शूटींग करुन झालं आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी २०२४ मध्ये ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  यावेळी या सीरिजमध्ये प्रेक्षकांना खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला मिळणार आहेत. आणि, महत्त्वाचं म्हणजे 'पाताललोक' पेक्षा 'पाताललोक 2' ही सीरिज पूर्णपणे वेगळी असणार आहे", असा खुलासा अविनाश अरुण यांनी केला आहे.

दरम्यान, या सीरिजमध्ये नेमके कोणते कलाकार झळकणार याविषयी अद्याप स्पष्टता नाही. मात्र, पाताललोकमधील हाथीराम चौधरी म्हणजेच अभिनेता  जयदीप अहलावत (Jaideep Ahalawat)  पाताललोक २ मध्येदेखील दिसणार आहेत. 

टॅग्स :वेबसीरिजअनुष्का शर्मासेलिब्रिटी