Join us

Panchayat Season 4 : 'पंचायत'चं शुटिंग कुठे झालं माहितीये का? पर्यटन स्थळ बनलंय 'हे' ठिकाण; तुम्हीही देऊ शकता भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 10:36 IST

Panchayat Season 4 : प्रधानजींचं घर, पाण्याची टाकी ते पंचायत कार्यालय... खरं गाव कुठे माहितीये का? सीरिजमध्ये बदललं नाव!

Panchayat Season 4 : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या वेब सीरिजची चर्चा होती, ती सीरिज अर्थात ' पंचायत सीझन ४ ' आता आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आधीचे तीन सीझन यशस्वी झाल्यानंतर निर्मात्यांनी २४ जून २०२५ रोजी प्राइम व्हिडीओवर पंचायतचा चौथा सीझन प्रदर्शित झाला. फुलेरा गाव आणि त्या गावतली हटके मंडळींनी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकलं. या वेब सीरिजचं कथानक, कलाकारांचा अभिनय यांच्यासोबतच आणखी एक गोष्ट चर्चिली जात आहे ते म्हणजे या वेब सीरिजमधील 'फुलेरा गाव' आणि तिथलं 'पंचायत कार्यालय'. त्यामुळे हे लोकेशन (Panchayat Filming Real Location) नेमकं कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते प्रयत्न करत आहेत. तर  याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.

'पंचायत' वेब सीरिजचं लोकेशन अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. हे खरंखुरं लोकेशन आहे की कुठे सेट उभा करण्यात आला आहे. असा प्रश्न प्रेक्षक उपस्थित करत आहेत. मात्र, हे लोकेशन खरंखुरं असून भारतामध्येच ते असून या ठिकाणी कोणीही सहज भेट देऊ शकतं. 'पंचायत'मध्ये दाखवलेलं 'फुलेरा गाव' हे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून ४७ किमी अंतरावर असलेल्या सिहोर जिल्ह्यातील 'महोदिया' हे गावं आहे.  या सीरिजमध्ये दाखवलेली बहुतेक ठिकाणे केवळ सेट नाहीत, तर ती वास्तविक आहेत. हे ठिकाण आता एक पर्यटन स्थळ बनले आहे. 

'पंचायत'मध्ये दाखवलेलं 'पंचायत कार्यालय' हे महोदिया ग्रामपंचायत कार्यालयाचा एक भाग आहे. अहवालानुसार, ते टीव्हीएफच्या निर्मिती पथकाने प्रतिदिन ५०० रुपये दराने भाड्याने घेतले होते. मुख्य अभिनेता जितेंद्र कुमार उर्फ ​​सचिव जी यांची ग्रामपंचायत कार्यालयात असलेली खोली महोदियाच्या ग्रामपंचायत कार्यालयातील एक अतिथी कक्ष आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो jenil variya नावाच्या एका  कंटेट क्रिएटरनं शेअर केलाय.  त्या व्हिडीओमध्ये 'पंचायत' वेब सीरिजचं शुटिंग स्थळ अर्थात महोदिया गाव (Panchayat Season 4  Shooting Completed In Mahodiya Madhya Pradesh) पाहायला मिळतेय. वेब सीरिजमध्ये 'पंचायत' कार्यालयाबाहेर एक हँडपंप दाखवण्यात आला होता, ज्याजवळ सचिव जी बसून कपडे धुत असत. प्रत्यक्षात तो तिथे नव्हता, तो क्रू मेंबरने बसवला होता आणि शुटिंगनंतर तो काढून टाकण्यात आला होता.

टॅग्स :वेबसीरिजसेलिब्रिटीमध्य प्रदेश