Join us
Daily Top 2Weekly Top 5

Panchayat 5: पुन्हा एकदा भरणार 'पंचायत', लोकप्रिय सीरिजच्या रिलीजबद्दल मोठी अपडेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 10:19 IST

अखेर मुहूर्त ठरला! 'पंचायत-५' च्या रिलीजबद्दल मोठी अपटेड, कधी होणार प्रदर्शित?

Panchayat 5 Release Update: ओटीटीवर गाजलेल्या सर्वाधिक सीरिजपैकी एक नाव म्हणजे पंचायत. २४ जून २०२५ रोजी प्राइम व्हिडीओवर ‘पंचायत’चा चौथा सीझन प्रदर्शित झाला.त्यानंतर चाहते या सीरिजच्या नवीन सीझनची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. अखेर  पंचायत-५ च्या रिलीज डेटबद्दल आता मोठी अपडेट समोर आली आहे. ‘पंचायत’ सीरिजमधलं फुलेरा गाव आणि त्या गावातली हटके मंडळी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

वेब विश्वातील प्रेक्षकांची सगळ्यात आवडती आणि सर्वाधिक बघितली जाणारी सीरीज म्हणून पंचायतकडे पाहिलं जातं. या सीरिजमध्ये  फुलेरा ग्रामपंचायतीची गोष्ट पाहायला मिळते. जिथे एक शहरी मुलगा सचिव म्हणून एका छोट्या गावात येतो आणि गावाच्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. ही कथा प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. अशातच या सीरिजच्या पाचव्या सीझनबद्दल मोठी माहिती मिळते आहे. आता पंचायत-५ सीरिज जून २०२६ मध्ये नाहीतर निर्माते जुलै महिन्यात ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म 'Amazon Prime' वर प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत, अशी नवी माहिती आता समोर आली आहे. मात्र, याला अद्याप अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही. 

पंचायत सीरिजचा पहिला सीझन ३ एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित झाला, त्यानंतर दुसरा सीझन १८ मे २०२२ रोजी रिलीज करण्यात आला. त्यानंतर २०२४ ला तिसरा सीझन आणि त्यापाठोपाठ  २४ जून २०२५ ला पंचायतचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला.चौथ्या पर्वाचा शेवट एका मोठ्या अनपेक्षित होता.फुलेरा पंचायतीमध्ये  क्रांती देवीने मंजू देवीचा पराभव करून गावची नवीन सरपंच बनली.ही राजकीय उलथापालथ पाचव्या सीझनमध्ये पाहायला मिळेल, आणि कथानक कोणतं नवं वळण घेणार हे पाहणं महत्तावाचं ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Panchayat 5' Release Date Update: Get Ready for More Village Antics!

Web Summary : Amazon Prime's popular series 'Panchayat' is likely to return! Season 5 might release in June or July 2026. The story continues with political changes in Phulera village, with Kranti Devi now the Sarpanch. Fans eagerly await the next chapter.
टॅग्स :वेबसीरिज