Webseries: मनोरंजनाच्या जगात ओटीटीमुळे अनेक बदल पाहायला मिळत आहेत. २०२५ हे वर्ष हॉरर चित्रपट प्रेमसाठी एक पर्वणीच असते. या वर्षामध्ये अनेक हॉरर सीरिज,चित्रपट वेगवेगळ्या माध्यमावर प्रदर्शित झाले.या भयपटांनी ओटीटीप्रेमींची अक्षरश झोप उडवली. जर तुम्हाला हॉरर चित्रपटप्रेमी असाल तर अशाच एका सीरिजबद्दल आपण जाणून घेणार आहोत.ही सीरिज पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या सीरिजचं नाव खौफ आहे.
खौफ या सीरिजची निर्मिती स्मिता सिंग यांनी तयार केली असून त्यामध्ये मोनिका पवार, रजत कपूर आणि चुम दरंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.ओटीटीप्रेमींनी आणि समीक्षकांनी या सीरिजी प्रशंसा केली आहे.त्याचबरोबर IMDb वर खौफ सीरिजला ७.१ रेटिंग मिळाले आहे. बिग बॉस १८ फेम चुम दरंग देखील यामध्ये महत्त्वाची भूमिकेत पाहायला मिळते आहे. ८ भागांच्या या सीरिजमध्ये प्रत्येक भाग ट्विस्ट भरलेला आहे.
असं आहे कथानक
खौफ ही एक इंडियन हॉरर सीरिज आहे. या सीरिजमध्ये दिल्लीतील वसतिगृहाची कथा दाखवण्यात आली आहे. अनेक रहस्यांनी दडलेल्या सीरिजचं कथानक खिळवून ठेवणारं आहे. या वसतीगृहामध्ये मधू नावाची एक मुलगी राहायला येते आणि ती भीतीच्या सावटाखाली जगू लागते. या खोलीत काही आत्मांचा वास असतो शिवाय त्यामागेत्या मुलीचा एक भयानक इतिहास देखील आहे, जो सुंदरपणे दाखवण्यात आला आहे.ही सीरिज प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.
Web Summary : The Indian horror series 'Khouf' revolves around a Delhi hostel haunted by secrets. A girl named Madhu experiences fear and uncovers a terrifying past within its walls. Starring Monica Pawar and Rajat Kapoor, it's available on Prime Video.
Web Summary : भारतीय हॉरर सीरीज 'खौफ' दिल्ली के एक हॉस्टल के चारों ओर घूमती है जो रहस्यों से भरा है। मधु नाम की एक लड़की डर का अनुभव करती है और इसकी दीवारों के भीतर एक भयानक अतीत को उजागर करती है। मोनिका पवार और रजत कपूर अभिनीत, यह प्राइम वीडियो पर उपलब्ध है।