सिनेमा, सीरिज किंवा अगदी मालिकाही असो कलाकारांना बोल्ड सीन्स, इंटिमेट सीन्स किंवा लव्हमेकिंग सीन्स करावे लागतात. बऱ्याचदा अभिनेत्रींना यामुळे अनकंफर्टेबल वाटतं. कित्येकदा अभिनेतेही अनकंफर्टेबल होतात. तसले सीन करताना कलाकाराची काय अवस्था होते यावर नुकतंच एका मराठी अभिनेत्रीने भाष्य केलं आहे. तसंच तिलाच आलेला अनुभवही तिने सांगितला आहे.
अडल्ट वेबसीरिजमध्ये दिसणारी अभिनेत्री तन्वी पाटील (Tanvi Patil) नुकतीच 'मुक्कापोस्ट मनोरंजन पॉडकास्ट'मध्ये आली होती. यावेळी तसल्या सीनबद्दलचा दृष्टिकोन सांगताना ती म्हणाली, "जेव्हा कोणी तुम्हाला तुमची इच्छा नसताना हात लावतंय तेव्हा एक स्त्री म्हणून अनकंफर्टेबल वाटतंच. सरळ शब्दात सांगायचं तर घाण वाटते. तर पहिल्यांदा माझ्यासोबत तसं झालं. मला अनकंफर्टेबल वाटलं. सीन झाल्यावर मनात विचार आलेला की 'अरे हे मी काय केलं?'. पण त्यानंतर मी खूप क्लिअर होते की कलाकार अभिनय करताना भावना ओतून काम करतो. नॉर्मल शॉट्ल असतील तेव्हा हे करणं स्वाभाविक आहे. पण तसले सीन्स करताना याची गरज नाहीच. हा एक स्क्रिप्टचा भाग आहे एवढाच विचार करुन तो सीन करायचा असतो. लव्हमेकिंग सीन हवाय हा कथेचा भाग आहे त्यामुळे तो सीन सीन सारखा घेऊन पुढे चालायचं. बास. हे कठीण नक्कीच आहे पण जमतं."
तन्वी पाटीलने तिच्या पहिल्याच सीरिजमध्ये टॉपलेस सीनही केला होता. याबद्दल सांगताना ती म्हणालेली की, "दोन पुरुष आणि मी असा आमच्यात लव्हमेकिंग सीन होता. माझ्या संपूर्ण आर्टिस्ट करिअरमधला तो पहिला लव्हमेकिंग सीन होता. त्यामुळे मुळात पहिल्याच सीनमध्ये थेट लव्हमेकिंग सीन करणं हेच माझ्यासाठी कठीण होतं. एकाच अभिनेत्यासोबत असलं असतं तरी ठीक होतं. पण नशिबाने माझे सहकलाकार खूप चांगले होते. त्यांनी समजून घेतलं. आम्ही आधी बसून चर्चा केली. कोण कशात कंफर्टेबल आहे हे जाणून घेतलं."