Maharani Season 4 OTT Release Date : पहिल्या तीन सीझनच्या भव्य यशानंतर सोनी लिव्हची बहुप्रतिक्षित 'महाराणी ४' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चौथ्या सीझनमध्ये आणखी मोठी आव्हानं आणि राजकीय गुंतागुंत पाहायला मिळणार आहे. या सीरिजमध्ये हुमा कुरेशी हिनं राणी भारतीची दमदार भूमिका साकारलेली आहे. निर्मात्यांनी आज गुरुवारी 'महाराणी ४' चा ट्रेलर आणि ओटीटी रिलीजची तारीख जाहीर केली आहे.
'महाराणी ४'च्या ट्रेलरमध्ये संसद, सत्ता सौदे आणि राजकीय युतींच्या खेळाची झलक स्पष्टपणे पाहायला मिळतेय. यावेळी कथा केवळ बिहारच्या राजकारणापुरती मर्यादित नाही. यावेळी थेट दिल्लीचं राजकारण पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये राणी भारती (हुमा कुरेशी) ही विपिन शर्मा यांनी साकारलेल्या पंतप्रधानांना खुले आव्हान देताना दिसते. ती म्हणते, "जर तुम्ही आमच्या शत्रूशी हातमिळवणी केली तर मी तुमचे सिंहासन हिसकावून घेईल". यावरून राणी आता राज्यांपुरती मर्यादित न राहता राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट होतं. त्यामुळे हा सीझन अधिक लक्षवेधक आणि रोमांचक असणार आहे.
'महाराणी सीझन ४' हा ७ नोव्हेंबर २०२५ पासून सोनी लिव्ह (SonyLIV) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल. या सीरिजमध्ये हुमा कुरेशीसोबत अमित सियाल, कनिकुश्रुती, विपिन शर्मा, विनीत कुमार आणि प्रमोद पाठक हे अनुभवी कलाकार या सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. 'महाराणी सीझन ४'ची कथा तिथून सुरू होणार आहे, जिथे मागील सीझनची कथा संपली होती.
Web Summary : The 'Maharani 4' trailer is out, showcasing political intrigue beyond Bihar, reaching Delhi. Rani Bharti challenges the Prime Minister, hinting at a national political entry. Streaming on SonyLIV from November 7, 2025, the series promises more drama.
Web Summary : 'महारानी 4' का ट्रेलर जारी, बिहार से आगे दिल्ली तक राजनीतिक षडयंत्र दिखा रहा है। रानी भारती प्रधानमंत्री को चुनौती देती हैं, जो राष्ट्रीय राजनीतिक प्रवेश का संकेत देती हैं। 7 नवंबर, 2025 से सोनीलिव पर स्ट्रीमिंग, श्रृंखला अधिक नाटक का वादा करती है।