Join us
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्र असतं ते! भाडिपाची 'आई, मी' सीरिज पुन्हा येणार, बबू-जुईचं लग्न होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 09:20 IST

नुकतेच 'आई, मी' सीरिजमधली कलाकार मंडळी भेटली होती आणि त्यांनी सोशल मीडियावर लाइव्ह करत थेट नेटकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पुन्हा एकदा 'आई, मी' सीरिज भेटीला येणार असल्याचे जाहीर केले.

भाडिपा या युट्युब चॅनेलवरील 'आई, मी', कांदेपोहे', 'कास्टिंग काऊचं', 'बेरोजगार', 'तू अभी तक है हसीन', '९ टू ५' अशा अनेक सीरिज लोकप्रिय ठरल्या. यात दैनंदिन आयुष्यात घडणारे प्रसंग गमतीशीर आणि रंजक पद्धतीनं मांडल्यामुळे प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळाली. त्यामुळे प्रेक्षक भाडिपा पुन्हा कोणत्या सीरिजचा दुसरा सीझन किंवा नवीन काही सुरु करतंय का, याची उत्सुकतेने वाट पाहत असतात. दरम्यान, नुकतेच 'आई, मी' सीरिजमधली कलाकार मंडळी भेटली होती आणि त्यांनी सोशल मीडियावर लाइव्ह करत थेट नेटकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अभिनेत्री रेणुका दफ्तरदार,अलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, स्वानंद तेंडुलकर आणि सारंग साठे उपस्थित होते. या लाइव्ह दरम्यान लवकरच पुन्हा एकदा 'आई, मी' सीरिज भेटीला येणार असल्याचे जाहीर केले.

सोशल मीडियावर लाइव्ह दरम्यान जवळपास ६५० लोक उपस्थित होते. त्यांना मृण्मयीने विचारले की तुम्हाला आम्ही रियुनियन करावं असं वाटतंय का?, रिल करावे का?, विषय काय असावा? याबद्दल तुम्ही संस्थापक सारंग साठे यांना मेसेज करा. यावेळी का युजरने बबू जुईचं लग्न झालं तर मज्जा येईल. त्यावर जुई म्हणजेच मृण्मयीने बब्बू म्हणजेच आलोकला विचारलं तुझा लग्नावर विश्वास आहे का? त्यावर सारंग साठे म्हणाला की, खऱ्या आयुष्यात नाहीये. पण पात्र म्हणून त्याचा लग्नावर विश्वास आहे. त्यावर सगळ्यांचे एकमत झाले की लग्नाचा एपिसोड करायचा. 

या लाइव्हदरम्यान कलाकारांचे बब्बू-जुईच्या लग्नाचा एपिसोड करायचं ठरलं. मग त्यांनी त्याचा महाएपिसोड करायचा की मिनी सीरिज करायचं का म्हणत तीन भागांची मिनी सीरिज करण्यावर शिक्कामोर्तब झालं. दरम्यान आलोक राजवाडेने यावेळी सांगितले की, त्याची आगामी वेबसीरिज शांतीत क्रांती २ १३ ऑक्टोबरला रिलीज होत आहे. त्यात मृण्मयीची छोटीशी दिलखेचक भूमिका आहे. सारंगने दिग्दर्शन केले आहे. रेणू ताईचा आशीर्वाद आहे आणि सोनी लिव्हवर रिलीज होत आहे.