Join us
Daily Top 2Weekly Top 5

'महाराष्ट्राची क्रश' झळकणार हिंदी वेब सीरिजमध्ये, हृता दुर्गुळे साकारणार डॅशिंग महिला पोलीस ऑफिसरची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 11:36 IST

हिंदी वेब सीरिजमधून हृता दुर्गुळेचं ओटीटीवर पदार्पण, ट्रेलरमध्ये दिसली झलक

'फुलपाखरू' मालिकेतून घराघरात पोहोचलेली हृता दुर्गुळे 'महाराष्ट्राची क्रश' आहे. हृताने अनेक मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली. काही मराठी सिनेमांमध्येही ती झळकली आहे. 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाचेही काही प्रयोग तिने केले होते. रंगभूमी, टेलिव्हिजन आणि रुपेरी पडदा गाजवल्यानंतर हृता आता ओटीटी गाजवण्यास सज्ज झाली आहे. हिंदी वेब सीरिजमधून हृता ओटीटीवर पदार्पण करत आहे. 

हृता 'कमांडर करण सक्सेना' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजमध्ये ती महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'कमांडर करण सक्सेना' वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून यामध्ये हृताचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे. पाकिस्तानचा एक कट उधळवून टाकण्याच्या तयारीत असलेल्या कमांडरची गोष्ट या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. हृताबरोबर या सीरिजमध्ये अभिनेता  गुरमीत चौधरी आणि इक्बाल खान मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ८ जुलैला ही वेब सीरिज हॉटस्टारवर प्रदर्शित केली जाणार आहे. 

हृताने 'दुर्वा' या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं. 'फुलपाखरू' मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. मन उडू उडू झालं या मालिकेतही ती दिसली होती. टाइमपास ३, अनन्या, कन्नी, सर्किट या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. आता हृता ओटीटीवरुन प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. तिच्या या वेबसीरिजसाठी चाहतेही उत्सुक आहेत. 

टॅग्स :ऋता दूर्गुळेवेबसीरिजटिव्ही कलाकार