Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! २२ दिवसांत तब्बल ५० मिलियन व्ह्यूज,  सात एपिसोडच्या 'या' सीरिजचा जगभरात जलवा, कुठे पाहाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 17:47 IST

७ एपिसोडची सीरिजचा जगभरात डंका! ठरलीसर्वाधिक व्ह्यूज मिळवणारी भारतीय सीरिज, या मराठमोळी अभिनेत्रीची आहे भूमिका 

Taskaree: The Smuggler's Web Series: ओटीटीवरील अनेक प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला विविध कलाकृती प्रदर्शित होत असतात. त्यामुळे येणाऱ्या नवीन महिन्यात कोणत्या जॉनरचे चित्रपट, सीरिज पाहायला मिळणार याबद्दल ओटीटीप्रेमींना प्रचंड उत्सुकता असते.अशातच सध्या जगभरात एका भारतीय सीरिजबद्दल जोरदार चर्चा सुर आहे.ही सीरिज डिजिटल प्लॅटफॉर्मवर नंबर वन ठरली आहे. शिवाय आयएमडीवर या सीरिजता ७.३ रेंटिंग मिळाले आहेत. 

दरम्यान, या सीरिजचं नाव 'तस्करीः द स्मगलर्स वेब'आहे. ही वेब सीरिज १४ जानेवारी २०२६ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. सध्या या सीरिजने केवळ भारतातच नाही तर जगभरात धुमाकूळ घातला आहे. रिलीजच्या पहिल्या आठवड्यातच, या वेब सीरिजने जागतिक टॉप १० सीरिजच्या यादीमध्ये स्थान पक्कं करत  इतिहास रचला.शिवाय, पहिल्या आठवड्यातच 'तस्करीः द स्मगलर्स वेब' सीरिजने ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा ओलांडला.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम सुप्रिटेंडंट म्हणून नेमणूक झालेला अर्जुन मीना ( इम्रान हाश्मी ) स्वतःचीच गोष्ट सांगतोय, अशी सीरिजची सुरुवात करण्यात आली आहे. ही छोटीशी गोष्ट या कलाकृतीला इतर सीरिजपेक्षा वेगळी ठरते. या सीरिजमध्ये चोर-पोलिसांचा खेळ, सामानातून चलाखीनं कोट्यवधी किमतीच्या गोष्टींची तस्करी करणाऱ्या चोरांची आणि त्यांना पकडण्यासाठी जाळं पसरवणाऱ्या कस्टम अधिकाऱ्यांच्या खेळाची रंजक गोष्ट दाखवण्यात आली आहे.

नीरज पांडे दिग्दर्शित, या मालिकेत शरद केळकर, अनुराग सिन्हा, झोया अफरोज, अमृता खानविलकर, फ्रेडी दारूवाला, अनुजा साठे आणि नंदिश संधू यांच्यासोबत इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Taskaree: The Smuggler's Web Series Hits 50 Million Views!

Web Summary : The Indian series 'Taskaree: The Smuggler's Web' is a global hit, reaching number one on digital platforms. Starring Emraan Hashmi, the series revolves around customs officers and smugglers at an airport, captivating audiences worldwide with its thrilling plot and high ratings.
टॅग्स :इमरान हाश्मीअमृता खानविलकरवेबसीरिज