Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ब्रिजर्टन' सीझन ४ चा दुसरा भाग 'या' तारखेला होणार रिलीज! नेटफ्लिक्सने दिली आनंदाची बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 11:41 IST

'ब्रिजर्टन' सीझन ४ च्या दुसऱ्या भागाची वाट बघताय? जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित

Bridgerton Season 4 : नेटफ्लिक्सवरील जगभरात लोकप्रिय झालेली 'पीरियड ड्रामा' मालिका "ब्रिजर्टन" (Bridgerton) आपल्या चौथ्या सीझनसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चौथ्या सीझनचा पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर आता चाहते दुसऱ्या भागाच्या प्रीमियरची आतुरतेने वाट पाहत आहेत. लंडनच्या उच्चभ्रू समाजातील राजेशाही थाट आणि प्रेमसंबंधांची ही रंजक कथा लवकरच एका मोठ्या वळणावर पोहोचणार आहे.

'ब्रिजर्टन' सीझन ४ दोन भागांमध्ये विभागण्यात आला आहे. यातील पहिला भाग २९ जानेवारी २०२६ रोजी भारतात प्रदर्शित झाला होता. आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून, सीझन ४ चा दुसरा भाग २६ फेब्रुवारी २०२६ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाणार आहे. नेटफ्लिक्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्टर शेअर करत ही अधिकृत घोषणा केली आहे.

काय आहे ब्रिजर्टन ?

ब्रिजर्टन ही सीरिज ज्युलिया क्विन यांच्या कादंबऱ्यांवर आधारित असून, शोंडा रायम्स यांच्या Shondaland बॅनरखाली तयार करण्यात आली आहे. ही कथा १९व्या शतकातील लंडन (Regency Era) मधील उच्चभ्रू समाजाभोवती फिरते. ब्रिजर्टन कुटुंबातील आठ भावंडांचे प्रेम, लग्न, गुपितं, राजकारण, समाजातील नियम आणि प्रतिष्ठा, या सगळ्यांची रंगतदार गोष्ट यात दाखवली आहे. प्रत्येक सीझन वेगवेगळ्या भावंडांच्या प्रेमकथेवर केंद्रित आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bridgerton Season 4 Part 2 Release Date Announced by Netflix!

Web Summary : Netflix announces Bridgerton Season 4, part two, will release February 26, 2026. The series, based on Julia Quinn's novels, follows the Bridgerton family's love, marriage, and secrets in 19th-century London's high society.
टॅग्स :नेटफ्लिक्सवेबसीरिज