Join us  

'द ग्रेट इंडियन कपिल' शोमध्ये दिसणार नाही भारती सिंग, कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 1:43 PM

Bharti Singh : 'द ग्रेट इंडियन कपिल' शो ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर एका नवीन फॉर्ममध्ये आणि शैलीत परतला आहे. या शोची जवळपास संपूर्ण टीम एकत्र आहे, पण यावेळी भारती सिंग यात दिसणार नाही.

'द ग्रेट इंडियन कपिल' (The Great Indian Kapil) शो ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर एका नवीन फॉर्ममध्ये आणि शैलीत परतला आहे. या शोची जवळपास संपूर्ण टीम एकत्र आहे, पण यावेळी भारती सिंग (Bharti Singh) यात दिसणार नाही. कपिल शर्माच्या शो(The Kapil Sharma Show)मध्ये भारती त्याच्या मावशीच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय तिने या शोमध्ये इतरही अनेक भूमिका साकारल्या आहेत. मात्र भारती सिंग नव्या सीझनमध्ये दिसणार नाही. सुनील ग्रोव्हर अनेक वर्षांनी नवीन सीझनसह शोमध्ये परतला आहे. भारती आणि कपिल शर्मा यांच्यात काही मतभेद झाले आहेत का? यावेळी तो 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'चा भाग का नाही? यावर भारती यांनी नुकतेच उत्तर दिले.

द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये कपिल व्यतिरिक्त कृष्णा अभिषेक, अर्चना पूरण सिंह, राजीव ठाकूर आणि किकू शारदा असल्याचे समजते आहे. अलीकडेच निर्मात्यांनी एक नवीन प्रोमो देखील शेअर केला, ज्यामध्ये तेच कलाकार दिसले. पण भारती सिंग किंवा चंदू चायवाला म्हणजेच चंदन प्रभाकर दिसले नाहीत.

याबाबत भारती सिंगने 'ईटाईम्स'ला सांगितले की, 'सध्या माझा कपिल भाईसोबत जाण्याचा कोणताही विचार नाही. पण काही झाले तर मी त्यात नक्कीच सहभागी होईन. सध्या मी माझ्या प्रोजेक्ट्स, पॉडकास्ट, 'डान्स दिवाने' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण मला फोन आला तर मी नक्की जाईन. सध्या माझ्या बॅगेत खूप गोष्टी आहेत आणि काहीतरी नवीन करायला वेळ कमी आहे.

कपिलशी कोणताही वाद नाहीभारती सिंग कपिल शर्मासोबत अनेक सीझनमध्ये दिसली होती. परंतु ती नवीन सीझनचा भाग बनली नाही कारण तिच्याकडे आधीपासूनच अनेक प्रोजेक्ट्स आहेत. भारती आणि कपिलमध्ये कोणताही वाद नाही. भारती आणि कपिलमध्ये खूप जवळचे नाते आहे. त्यांच्यात भाऊ-बहिणीचे नाते आहे आणि भारतीही कपिलला राखी बांधते.

३० मार्चपासून भेटीला येणार 'द ग्रेट इंडियन कपिल शो''द ग्रेट इंडियन कपिल शो' ३० मार्चपासून नेटफ्लिक्सवर प्रसारीत होईल. निर्मात्यांनी नुकताच त्याचा प्रोमो रिलीज केला होता, ज्यामध्ये रणबीर कपूर, नीतू कपूर, रिद्धिमा कपूर, परिणीती चोप्रा, दिलजीत दोसांझ, रोहित शर्मा आणि आमिर खान यांची झलक दाखवण्यात आली होती.

टॅग्स :भारती सिंगकपिल शर्मा