Join us

'...की हिलाच अडकवलंय?', 'रानबाजार' रिलीज झाल्यानंतर तेजस्विनी पंडितची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 14:59 IST

RaanBaazar: 'रानबाजार' ही वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. या सीरिजचीप्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांच्या बोल्ड सीनमुळे खूप चर्चा होते आहे.

सध्या रानबाजार (RaanBaazaar) या मराठी वेबसीरिजची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. या वेबसीरिजच्या टीझर आणि ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखी वाढली होती. आता ही वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. या सीरिजमध्ये प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आणि तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) यांनी बोल्ड सीन दिले आहेत. दरम्यान अभिनेत्री तेजस्विनी पंडितने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, जी खूप चर्चेत आली आहे.

तेजस्विनी पंडित हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, खेळ कोण खेळतंय? ही अडकलीये? की हिलाच अडकवलंय? तेजस्विनी पंडित As आयेशा, बघितली का? 'रानबाजार' 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर!

लोकमतशी बोलताना तेजस्विनी म्हणाली, कलाकार म्हणून आता मी ट्रोलिंगच्या पुढे गेली, मी माझा दृष्टीकोन बदलला आहे. त्यामुळे या सगळ्याकडे मी निगेटिव्ह दृष्टीकोनातून पाहत नाही. मला वाटत नाही टीझर किंवा ट्रेलरमध्ये काही नेगिटीव्ह होते परंतु ते लोकांनी निगेटिव्ह घेतल्यामुळे ते जास्त व्हायरल झाले. हरकत नाही ते व्हायरल झालं म्हणून लोकांनी ते बघितलं. अभिनेत्री म्हणून मला कपडेच काढायचं असते तर ते मी कुठल्याही गाण्यावर केले असते. एक बोल्ड सीन पाहून ट्रोलिंग करणं योग्य नाही. 

अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या रानबाजारची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, रावण फ्युचर प्रॉडक्शन्स आणि अभिजित पानसे,अनिता पालांडे यांनी केली आहे. 

'त्या' दोघींमुळे राजकारणात आणलेल्या वादळाची रंजक गोष्ट! 'रानबाजार'... नवी कोरी वेबसीरीज पाहा फक्त प्लॅनेट मराठीवर. अ‍ॅप इन्स्टॉल करा आत्ताच! अँड्रॉईड युजर्ससाठी >> https://bit.ly/3wCnSPx आयफोन युजर्ससाठी >> https://apple.co/39Z5cBS

टॅग्स :तेजस्विनी पंडितरानबाजार वेबसीरिज