Join us

आम्हीदेखील मानवच

By admin | Updated: October 27, 2014 00:05 IST

चित्रपट कलावंत काही देव नसतात तेदेखील सर्वसामान्य मनुष्यच असतात, असे महानायक अमिताभ बच्चन यांनी सांगितले. दक्षिणेकडील राज्यात चित्रपट कलावंतांना देवदेवतेप्रमाणे मानले जाते.

चित्रपट कलावंत काही देव नसतात तेदेखील सर्वसामान्य मनुष्यच असतात, असे महानायक अमिताभ बच्चन यांनी सांगितले. दक्षिणेकडील राज्यात चित्रपट कलावंतांना देवदेवतेप्रमाणे मानले जाते. याबाबत ७२ वर्षीय अभिताभ यांनी ब्लॉगवर आपली मते मांडली आहेत. कलावंतांना देव का समजले जाते, याचे कोडे मला कायम पडते; परंतु अद्याप त्याचे उत्तर मात्र सापडले नाही. कलावंतांचे अस्तित्व सामान्य माणसाप्रमाणेच असते. आम्हीदेखील मानवच आहोत. कलावंतांना देवत्व बहाल करणे सर्वस्व चुकीचे आहे, असे अमिताभ यांनी सांगितले. अमिताभ यांनी नुकतीच ‘शमिताभ’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली असून, सध्या ते ‘दो’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.