Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आपल्याकडे हिरो ठरवतो सिनेमाची हिरोईन", संस्कृती बालगुडेनं सांगितलं सिनेइंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 16:54 IST

Sanskruti Balgude : संस्कृती बालगुडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच तिने एका मुलाखतीत मराठी कलाविश्वातील काळी बाजू सांगितली आहे.

अभिनेत्री संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) हिने मालिका आणि चित्रपटात विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. शेवटची ती चौक या चित्रपटात पाहायला मिळाली. संस्कृती सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळेही ती चर्चेत येत असते. आता पुन्हा ती चर्चेत आली आहे. नुकतेच तिने एका मुलाखतीत मराठी कलाविश्वातील काळी बाजू सांगितली आहे.

अभिनेत्री संस्कृती बालगुडे अभिनेत्रीसोबत उत्तम नृत्यांगणा आहे. तिने पिंजरा मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केले. त्यानंतर ती सिनेमात झळकली आहे. आतापर्यंत तिने बऱ्याच सिनेमात काम केले. मात्र तरीदेखील तिला बरेचजण अभिनेत्री म्हणून गृहित धरत नाहीत. ते आजही तिला नृत्यांगणा म्हणूनच संबोधतात. याबद्दलची खंत तिने मित्र म्हणे या पॉडकास्टमध्ये बोलून दाखवली. याशिवाय तिने तिला सिनेइंडस्ट्रीत आलेल्या अनेक चांगल्या वाईट अनुभवांबद्दल सांगितले. 

बऱ्याचदा अभिनेताच करतो नायिकेचं कास्टिंगएका सिनेमाचा अनुभव सांगताना निर्माता, दिग्दर्शक नाही तर अभिनेता नायिकेचं कास्टिंग करतो याबद्दल सांगितलं. ती म्हणाली की, एका चित्रपटासाठी माझं कास्टिंग झालं होतं. दिग्दर्शक आणि कास्टिंग दिग्दर्शकाने फोन करुन मला सांगितलं की आपण हे सुरु करतोय. मात्र नंतर त्यांनी मला फोन करुन सांगितलं की, जो अभिनेता आहे, त्याने म्हटलं की, मी दुसऱ्या कास्टिंगचा विचार करेन. त्यामुळे मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्रीचं कास्टिंग देखील अनेकदा हिरोच ठरवतात.

नवा लूक नव्या सिनेमासाठीसंस्कृती बालगुडेने नुकतेच शॉर्ट हेअर केले आहेत. तिने हा लूक तिच्या आगामी सिनेमासाठी केला आहे. तिने नुकतेच या प्रोजेक्टचे कामदेखील पूर्ण केले आहे. तिने या चित्रपटात ती आतापर्यंत न पाहिलेल्या अशा वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे, असेही तिने या मुलाखतीत सांगितले.

टॅग्स :संस्कृती बालगुडे