Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आमचं लग्न १८ वर्षांचं झालं..", वैभव मांगलेची लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 12:49 IST

Vaibhav Mangale : आज वैभव मांगलेच्या लग्नाचा १८वा वाढदिवस असून या निमित्ताने त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय.

वैभव मांगले (Vaibhav Mangale) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. वैभव मांगलेला कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपली छाप उमटविली आहे. अभिनेता सोशल मीडियावर फारसा सक्रीय नाही. मात्र बऱ्याचदा या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देताना दिसतो. दरम्यान आज वैभव मांगलेच्या लग्नाचा १८वा वाढदिवस असून या निमित्ताने त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय. 

अभिनेता वैभव मांगले सध्या आपल्या पत्नी आणि मुलांसोबत आंबा घाट येथे व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. तिथला पत्नीसोबतचा फोटो शेअर करत अभिनेत्याने लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिले की, आज आमचं लग्न १८ वर्षाचं झालं . आशीर्वाद द्या. त्याच्या या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. यावर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियावैभव मांगलेच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिले की, तुमचं प्रेम असंच चिरतरुण राहो. अभिनेता संजय भाडळे पाटीलने लिहिले की, स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन, फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन, एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम, हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम. !!! शुभेच्छूक !!!  

अभिनेत्याची पत्नी या क्षेत्रात आहेत कार्यरतवैभव मांगले यांच्या पत्नीचं नाव मयुरी मांगले आहे. त्या सिप्ला कंपनीत कामाला आहेत. वैभव मांगले सोशल मीडियावर बऱ्याचदा पत्नी आणि कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

वर्कफ्रंटवैभव मांगलेनं २००४ साली 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केले. 'मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी' या नाटकातून अभिनयाची सुरुवात केली. 'अलबत्या गलबत्या' नाटकात साकारलेली चिंची  चेटकिण रसिकांना खूप भावली. 'टाइमपास'मधील त्याने केलेली भूमिका कायम प्रेक्षकांच्या मनावर कोरलेली आहे. याव्यतिरिक्त मांगलेने एक गाव भुताचा, मालवणी डेज, माझे पती सौभाग्यवती आणि शेजारी शेजारी पक्के शेजारी यांसारख्या मालिकेतही काम केले आहे.

टॅग्स :वैभव मांगले