Join us

वाया गेलेला मॅच्युअर प्रथमेश

By admin | Updated: September 9, 2015 04:52 IST

‘बालक पालक’मध्ये हातावर संपदाऐवजी ‘सानपाडा’ आणि ‘टाइमपास’मध्ये शाकालच्या डोक्यावर नाचणाऱ्या दगडूची भूमिका कायम लक्षात ठेवायला लावणारा प्रथमेश परब

‘बालक पालक’मध्ये हातावर संपदाऐवजी ‘सानपाडा’ आणि ‘टाइमपास’मध्ये शाकालच्या डोक्यावर नाचणाऱ्या दगडूची भूमिका कायम लक्षात ठेवायला लावणारा प्रथमेश परब आता अजून एका टपोरी मुलाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या दोन्ही चित्रपटांत तसा शांत दिसलेला दगडू आगामी चित्रपट ‘उर्फी’मध्ये हॉकीस्टीकने मारामारी आणि लाथा-बुक्क्या घालताना २३ आॅक्टोबरला पाहायला मिळणार आहे; पण या चित्रपटात टपोरी मुलगा दिसणार असला, तरी तो मॅच्युअर होऊनही वाया गेलेल्या मुलाची भूमिका साकारणार आहे. कारण, त्याला माहीत असतं की कोणत्या क्षणी मॅच्युअर असल्यासारखं वागायचं आणि कधी वाया गेलेल्या मुलगा दाखवायचा. प्रथमेश त्याच्या भूमिकेबद्दल सांगतो, प्रत्येक घर बघायला येणारा क्लाएंट हा ‘देवा’ म्हणजे प्रथमेशने घर दाखवल्याशिवाय पाहणारच नाही, अशी वेल नोन पर्सनॅलिटी असणाऱ्या एजंटचा रोल मी साकारत आहे. जो पुढे काय होईल याची चिंता करत न बसता, त्यावर अ‍ॅक्शन घेतो आणि ते नेहमी तसंच घडत असतं.’