Join us

रिअल लाईफमध्ये बबीताला डेट करायची संधी मिळाली तर? वाचा, जेठालालचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 17:26 IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : मी एक विवाहित आणि…! तूर्तास जेठालाल उर्फ दिलीप जोशी यांचा एक जुना व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय....

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’  ( Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या अफाट लोकप्रिय मालिकेतील जेठालालला कोण ओळखत नाही?  जेठालाल व बबीताची पडद्यावरची केमिस्ट्री पाहून तर चाहते बेभान होतात. जेठालाल रोज नवनव्या पद्धतीने बबीताला इम्प्रेस करताना दिसतो आणि अय्यरचा तीळपापड होतो. पण रिअल लाईफमध्ये काय? तूर्तास जेठालाल उर्फ दिलीप जोशी (Dilip Joshi) यांचा एक जुना व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओत दिलीप जोशी बबीताला रिअल लाईफमध्ये डेट करण्याबद्दलच्या एका प्रश्नाला उत्तर देत आहेत.होय, रिअल लाईफमध्ये बबीताजीला डेट करण्याची संधी मिळाली तर करणार का? असा प्रश्न दिलीप जोशी यांना विचारला जातो. यावर हसत हसत ते म्हणतात, ‘जेठालालबद्दल मला माहित नाही. पण दिलीप जोशीला कधीच हे करायला आवडणार नाही. मी विवाहित पुरूष आहे आणि माझ्या संसारात आनंदी आहे. त्यामुळे मला त्याची गरज नाही.’

दिलीप जोशींचा हा व्हिडीओ एका फॅन क्लबने शेअर केला आहे आणि सध्या तुफान व्हायरल होतोय. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये टप्पू सेनेनंतर जेठालाल व बबीताची मैत्री प्रचंड हिट आहे. जेठालालला बबीता मनापासून आवडते आणि कधी एकदा तिच्यासोबत वेळ घालवण्याची संधी मिळते, याची तो प्रतीक्षा करत असतो. 

मध्यंतरी बबीता उर्फ मुनमून दत्ता (Munmun Dutta) मालिकेतील टप्पू अर्थात राज अनदाकतला डेट करत असल्याच्या चर्चा पसरल्या होत्या. स्वत:पेक्षा 9 वर्षांनी लहान टप्पूला डेट करत असल्याच्या या चर्चांमुळे मुनमुन प्रचंड ट्रोल झाली होती. यानंतर मुनमुनने ट्रोल करणा-यांवर संताप व्यक्त करत, एक खुलं पत्र इन्स्टाग्रामवर शेअर केलं होतं. मला आज भारताची लेक म्हणायला लाज वाटतेय, अशा तीव्र शब्दांत तिनं आपला संताप व्यक्त केला होता. राजला डेट करत असल्याच्या चर्चाही तिने फेटाळून लावल्या होत्या. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मामुनमुन दत्ता