Join us
Daily Top 2Weekly Top 5

वेड लागले नोझ रिंगचे

By admin | Updated: September 8, 2016 03:39 IST

मराठी इंडस्ट्रीत सध्या प्रत्येक अभिनेत्रीला नोझ रिंगचे वेड लागलेले पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्री नोझ रिंगमध्ये झळकत असल्याचे दिसत आहेत

मराठी इंडस्ट्रीत सध्या प्रत्येक अभिनेत्रीला नोझ रिंगचे वेड लागलेले पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्री नोझ रिंगमध्ये झळकत असल्याचे दिसत आहेत. एवढेच नव्हे, तर या सुंदर अभिनेत्री ‘आय लव्ह नोझ रिंग’ असे स्टेटसदेखील सोशल मीडियावर टाकत आहेत. त्यांची ही नोझ रिंग स्टाइल सोशल मीडियावरदेखील हिट ठरली आहे. अशाच काही सेलिब्रिटींचा घेतलेला हा आढावा...तेजस्विनी पंडित : काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर या सोशल नेटवर्किंग साइटवर तेजस्विनीने दोन लाख फोलोव्हर्सचा टप्पा पार केला. त्यामुळे तिने एक हटके फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या फोटोमध्ये तिने नोझ रिंग घातली होती. या नोझ रिंगमुळे तेजस्विनीच्या सौंदर्याला चार चाँद लागले आहेत. क्रांती रेडकर : प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री क्रांती रेडकरदेखील नोझ रिंगच्या प्रेमात पडलेली दिसत आहे. क्रांतीने भली मोठी गोल आकाराची नोझ रिंग घातलेली आहे. तिने या नोझ रिंगचा फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला होता. ही नोझ रिंग मंजिरी ओकने डिझाइन केली होती, असेही तिने म्हटले होते. सोनाली कुलकर्णी: वेगवेगळया लूकमध्ये सोनाली नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वी सोनालीनेदेखील नोझ रिंग घातलेला फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता. या फोटोमध्ये घातलेल्या डायमंड नोझ रिंगमध्ये सोनाली खूप सुंदर दिसत होती. तिच्या या हटके लूकला चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला असल्याचे पाहायला मिळाले होते.स्वानंदी टिकेकर: ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेत स्वानंदी एका डॅशिंग भूमिकेत पाहायला मिळाली होती. हाच डॅशिंगपणा तिने कायमस्वरूपी ठेवला असल्याचे दिसत आहे. कारण स्वानंदीने नाकामध्ये कात्रीच्या आकाराची नोझ रिंग घातलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. शिवानी सुर्वे: शिवानी सध्या जाना ना दिल से दूर या हिंदी मालिकेत व्यग्र आहे. पण ती नेहमीच सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात असते. या अभिनेत्रीलादेखील नोझ रिंगने वेड लावले आहे. तिनेदेखील सुंदर नोझ रिंगमधला फोटो नुकताच सोशल मीडियावर अपलोड केला होता. श्रुती मराठे: श्रुती नोझ रिंगपेक्षा नथला अधिक महत्त्व देते. श्रुतीने नाकात नथ घातलेला एकदम हटके फोटो सोशल मीडियावर टाकला आहे. सगळ्यांचे नोझ रिंगचे वेड पाहता, श्रुतीने नक्कीच हा वेगळा प्रयत्न केलेला आहे. शिवानी रांगोळे: शिवानी आपल्याला नेहमीच हटके स्टाईलमध्ये पाहायला मिळते. शिवानी केवळ पडद्यावरच नव्हे, तर तिच्या खऱ्या आयुष्यातही स्टाईलमध्ये वावरण्याचा प्रयत्न करते. तीदेखील सध्या अनेक वेळा नोझ रिंगमध्ये पाहायला मिळत आहे.